Ind vs Aus 1st T20 : पावसाने केला गेम ओव्हर! फक्त 58 चेंडूनंतर पहिला टी-20 सामना रद्द, आता मेलबर्नमध्ये भिडणार दोन्ही संघ, किती तारखेला? जाणून घ्या
Ind vs Aus T20 Marathi Updates : कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली टीम इंडिया पाच सामन्यांची टी-20 मालिका (T20 Series) खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
LIVE

Background
India vs Australia 1st T20 Update : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची वन-डे मालिका संपल्यानंतर आता कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली टीम इंडिया पाच सामन्यांची टी-20 मालिका (T20 Series) खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलिया त्यांच्या घरच्या मैदानाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल, तर भारत विश्वविजेता संघ म्हणून मैदानात उतरेल. टी-20 मालिकेचे सामन्यांसाठी वेळेत मोठा बदल झाला आहे. सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी सुरू होतील. म्हणजेच, सामन्याचा पहिला चेंडू पाऊणे दोन वाजता टाकला जाईल.
Ind vs Aus 1st T20 : पावसाने केला गेम ओव्हर! फक्त 58 चेंडूनंतर पहिला टी-20 रद्द, आता मेलबर्नमध्ये पुन्हा भिडणार दोन्ही संघ
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. सामना सुरुवातीपासूनच पावसाच्या व्यत्ययामुळे प्रभावित झाला आणि त्यामुळे दोन्ही डाव 18 षटकांपर्यंत मर्यादित करण्यात आला. पण, सामन्यादरम्यान पुन्हा एकदा 10व्या षटकात पावसाने व्यत्यय आणला आणि शेवटी पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी भारतीय संघ फलंदाजी करत होता. सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल क्रीजवर होते. भारताने 9.4 षटकांत 97 धावांवर 1 गडी गमावला होता. आता मेलबर्नमध्ये दुसरा सामना 31 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल.
Ind vs Aus 1st T20 live : पावसामुळे खेळ पुन्हा थांबला, किती वाजता सुरू होणार मॅच?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात पुन्हा एकदा पावसाने व्यत्यय आणला आहे.
पावसामुळे सामना थांबवण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, पाच षटके पूर्ण झाल्यानंतर सामना थांबवण्यात आला होता.
सामना आधीच दोन षटकांनी कमी करण्यात आला होता आणि आता पुन्हा एकदा पावसामुळे सामना विस्कळीत झाला आहे.
थांबण्याच्या वेळी भारताने 9.4 षटकांत एका गडी बाद 97 धावा केल्या होत्या.
सामना किती वाजता सुरू होईल, हे आता तरी सांगता येणार नाही.




















