KL Rahul : केएल राहुलसह कुलदीप यादवचा वेस्ट इंडिजविरुद्धच्या संघात नाव, पण मैदानात उतरण्यावर प्रश्न कायम, नेमकं कारण काय?
भारतीय संघ याच महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादीत षटकांचे सामने खेळणार असून टी20 सामन्यांसाठी नुकताच भारतीय संघ जाहीर झाला आहे.
![KL Rahul : केएल राहुलसह कुलदीप यादवचा वेस्ट इंडिजविरुद्धच्या संघात नाव, पण मैदानात उतरण्यावर प्रश्न कायम, नेमकं कारण काय? Inclusion of KL Rahul and Kuldeep Yadav is subject to fitness says BCCI After announcing squad for T20I series against West Indies KL Rahul : केएल राहुलसह कुलदीप यादवचा वेस्ट इंडिजविरुद्धच्या संघात नाव, पण मैदानात उतरण्यावर प्रश्न कायम, नेमकं कारण काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/14/7d437c1618b20d9246d2f6d9489ebcc31657808248_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Team India for West Indies Tour : इंग्लंडविरुद्धचे सामने आटोपल्यानंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात मर्यादीत षटकांचे सामने खेळवले जाणार असून यामध्ये एकदिवसीय आणि टी20 सामने असणार आहेत. यासाठी बीसीसीआयने 18 सदस्यीय टी20 संघ नुकताच जाहीर केला. ज्यामध्ये भारताचा आघाडीचा फलंदाज केएल राहुल आणि चायनामन गोलंदाज कुलदीप यादव (KL Rahul and Kuldeep yadav) संघात परतले आहेत. दोघांची नावही संघात असली तरी ते खेळणार की नाही यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.
कारण या दोघांनाही दुखापतीमुळे मागील काही सामने संघात खेळता आलेलं नाही. कुलदीप तर बऱ्याच महिन्यांपासून संघात नसून राहुल आयपीएलनंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी दुखापतग्रस्त झाला. सध्या हे दोघेही रिकव्हर होत असून वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी दोघेही पूर्णपणे फिट असतील तर त्यांना संघात स्थान मिळेल असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे. बीसीसीआयने ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
Rohit Sharma (C), I Kishan, KL Rahul*, Suryakumar Yadav, D Hooda, S Iyer, D Karthik, R Pant, H Pandya, R Jadeja, Axar Patel, R Ashwin, R Bishnoi, Kuldeep Yadav*, B Kumar, Avesh Khan, Harshal Patel, Arshdeep Singh.
— BCCI (@BCCI) July 14, 2022
*Inclusion of KL Rahul & Kuldeep Yadav is subject to fitness.
कसा आहे वेस्ट इंडिजविरुद्ध भारती संघ?
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, केएल राहुल, सूर्याकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.
हे देखील वाचा-
- IND vs WI T20 Squad : वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय टी20 संघाची घोषणा, कोहली-बुमराह संघात नाही, कसा आहे संपूर्ण स्कॉड?
- India Tour of West Indies 2022: भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर; कधी, कुठे रंगणार सामने?
- Legends League : लवकरच सुरु होणार लेजेंड्स लीग क्रिकेटचा नवा हंगाम, सेहवागसह पठाण बंधूही उतरणार मैदानात
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)