(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ICC T20 World Cup 2022 : 'विश्वचषकात भारताला कोहलीची गरज पडणार', अजित आगरकरने सांगितलं कारण
Virat Kohli : बऱ्याच काळापासून जगातील अव्वल दर्जाचा फलंदाज विराट कोहली खास कामगिरी करत नसल्याचं दिसत आहे. पण असं असली तरी विराटला टीकांसह तितकाच सपोर्टही मिळत आहे.
Virat Kohli Team India T20 World Cup : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) मागील बऱ्याच काळापासून खास फॉर्ममध्य नसल्याचं दिसत आहे. 2019 पासून एकही शतक कोहलीने ठोकलं नसून नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही विराट खास कामगिरी करु शकला नाही. अशामध्ये आगामी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup 2022) विराट टीम इंडियामध्ये असेल की नाही? अशा चर्चांना देखील उधान आलं आहे. दरम्यान माजी भारतीय क्रिकेटर अजित आगरकर (Ajit Agarkar) याने विराटला पाठिंबा देत भारताला विश्वचषकात कोहलीची गरज लागेल, असं वक्तव्य केलं आहे. कोहलीला धावा कशा करायच्या हे नेमकं माहित आहे, असंही आगरकर म्हणाला आहे.
कोहलीने नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात खराब प्रदर्शन केलं.तो एकमेव कसोटी सामन्यात 31 रन करुन तंबूत परतला. त्यानंतर एकदिवसीय आणि टी20 सामन्यांमध्येही तो खास कामगिरी करु शकला नाही. त्यामुळे अनेकांनी तिच्यावर टीका देखील केली. अशामध्ये आता भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकरने मात्र विराटला पाठिंबा देत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. 'इंडिया टुडे' मध्ये आलेल्या बातमीनुसार आगरकर म्हणाला, ''विराटला माहित आहे, की कसे रन केले जातात. त्यामुळे मला आशा आहे की लवकरच तो पुन्हा फॉर्ममध्ये परत येईल आणि भारतासाठी विश्वचषकात देखील खेळेल.अशामध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या सामन्यांत विराटं असणं गरजेचं आहे.''
2019 पासून एकही शतक नाही
तब्बल 70 शतकं नावावर असलेल्या विराटला 2019 पासून एकही शतक ठोकता आलेलं नाही. नोव्हेंबर 2019 मध्ये बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात कोहलीने शतक ठोकलं होतं. ज्यानंतर कोहलीला गेल्या अडीच वर्षांत तिन्ही फॉरमेटमध्ये एकही शतक झळकावता आलं नाहीये. आयपीएलच्या पंधराव्या हंगामापूर्वी त्यानं विश्रांती घेतली. विशेष म्हणजे, आयपीएलमध्येही विराटला काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानं आयपीएल 2022 मध्ये एकूण 16 सामन्यात फक्त 341 धावा केल्या. दरम्यान, टी-20 विश्वचषकाला काहीच महिने शिल्लक राहिले आहेत. यामुळं विराट कोहलीचं फॉर्ममध्ये येणं भारतीय संघासाठी खूप गरजेचं आहे. पण इंग्लंड दौऱ्यातही विराट अजिबात खास कामगिरी करु शकला नसल्याचं दिसून आलं आहे.
हे देखील वाचा-
- Shikhar Dhawan : धवनचं शतक हुकलं, सहाव्यांदा झाला 'नर्व्हस 90' चा शिकार, पण एक खास रेकॉर्ड केला नावावर
- WI vs IND: विकेटकिपर म्हणावं की सुपरमॅन, सामना हातातून निसटताना संजू सॅमसनची जबरदस्त फिल्डिंग!
- WI Vs IND: अखेरच्या षटकात 15 धावा रोखण्याचं आव्हान, दोन आक्रमक फलंदाज क्रिजवर; त्यांनाही पुरून उरला मोहम्मद सिराज!