एक्स्प्लोर

IND vs SA, 3rd ODI, Weather Report : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पावासाचा व्यत्यय? कसं असेल दिल्लीचं वातावरण?

IND vs SA, 3rd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात उद्या अर्थात 10 ऑक्टोबरला तिसरा एकदिवसीय सामना पार पडणार असून मालिकाविजयासाठी दोन्ही संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.

IND vs SA, 3rd ODI, Weather Report : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम (Arun Jaitley Cricket Stadium) येथे खेळवला जाणार आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील हा तिसरा सामना असून पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने तर दुसरा सामना भारताने जिंकत मालिका 1-1 अशी झाली आहे. त्यामुळे आजचा सामना जिकणारा संघ मालिकाही जिंकणार आहे. त्यामुळे दोन्ही संघासाठी आणि मालिकेचा विजेता संघ ठरवण्यासाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. अशामध्ये आजच्या सामन्यात पावासाने व्यत्यय आणल्यास सामना संपूर्ण ओव्हर्सचा होणार नाही, त्यामुळे सामन्यापूर्वी आजचं सामना होणाऱ्या ठिकाणचं वातावरण कसं आहे ते पाहूया...

सध्या पावसामुळे दिल्लीत परिस्थिती खराब आहे. मागील काही दिवसांपासून दिल्लीच्या आसपासच्या भागात सतत पाऊस पडत आहे. त्यामुळेच तिसऱ्या वनडे सामन्यावर पावसाचा धोका निर्माण झाला आहे. पावसामुळे या महत्त्वाच्या सामन्यात व्यत्यय येऊ शकतो. या सामन्यात पाऊस येणार का याबद्दल अद्याप स्पष्टपणे काहीही सांगता येणार नाही. दरम्यान हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीत सामन्याच्या दिवशी म्हणजेच 10 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 10 वाजेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता अशा स्थितीत सामन्यातही पावसाचा व्यत्यय येईल का? हे सामना सुरु झाल्यावरच कळेल.  पावसाच्या व्यत्ययामुळे सामना झाला नाही तर मालिका 1-1 अशा बरोबरीत अनिर्णीत सुटू शकते.

कधी, कुठे पाहू शकता सामना?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा एकदिवसीय सामना (India vs South africa 3rd ODI) भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळवला जाणार आहे. सामना दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   

कशी असू शकते दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया?

शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget