IND vs NZ, Weather Reoport : भारत-न्यूझीलंड तिसऱ्या टी20 मध्ये पाऊस व्यत्यय आणणार का? कशी असेल हवामानाची स्थिती?
IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरु टी20 मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक टी20 सामना मंगळवारी 22 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे.
India vs New Zealand, Weather report : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील टी20 मालिका आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पहिला सामना पावसामुळं रद्द झाल्यावर दुसरा सामना भारताने जिंकला. आता अखेरचा सामना उद्या अर्थात मंगळवारी 22 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. भारताने हा सामना जिंकल्यास मालिकाही भारत जिंकेल तर न्यूझीलंडने सामना जिंकल्यास मालिका अनिर्णीत सुटणार आहे. तर अशा या निर्णायक सामन्यावेळी पाऊस आल्यास खोळंबा होईल हे नक्की. त्यात पहिल्या दोन्ही सामन्यात पावसाने हजेरी लावली होती. ज्यामुळे पहिला सामना झालाच नाही. पण दुसरा सामना काहीशा व्यत्ययानंतर अखेर पार पडला. तर आता तिसऱ्या सामन्यावेळी हवामानाची स्थिती कशी असेल जाणून घेऊ...
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 22 नोव्हेंबर म्हणजेच उद्या मंगळवारी होणाऱ्या तिसऱ्या आणि टी20 मालिकेतील शेवटच्या T20 सामन्यात पावसाची शक्यता नाही. हवामान विभागाने (Weather Report) दिलेल्या माहितीनुसार दुपारच्या वेळे काही प्रमाणाच पाऊस पडू शकतो, पण सामना सायंकाळी सुरु होणार असल्याने सामना सुरू होईपर्यंत पाऊस थांबेल. सामना होणाऱ्या ठिकाणचं किमान तापमान हे 14 अंशांच्या आसपास असणार आहे. तर कमाल तापमान 28 अंशांच्या आसपास राहील, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. पावसाची शक्यता नाही ही दोन्ही संघांसाठी आणि क्रिकेट चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे.
कधी, कुठे पाहाल सामना?
भारतीय वेळेनुसार आजचा भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना दुपारी 12 वाजता खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. सामना नॅपियर येथील मॅकलिन पार्क क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर होणार आहे. तसेच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
टी20 मालिकेसाठी कसा आहे भारतीय संघ?
हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
हे देखील वाचा-