![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
IND vs SL, 1st T20: सूर्यकुमार, दीपक चाहर दुखापतग्रस्त, कशी असेल टीम इंडियाची अंतिम 11?
IND vs SL, 1st T20: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात आजपासून टी20 मालिकेला सुरुवात होत आहे. तीन सामन्यांची मालिका दोन्ही संघात खेळवली जाणार आहे.
![IND vs SL, 1st T20: सूर्यकुमार, दीपक चाहर दुखापतग्रस्त, कशी असेल टीम इंडियाची अंतिम 11? In first T20 match against sri lanka this could be indias probable 11 IND vs SL, 1st T20: सूर्यकुमार, दीपक चाहर दुखापतग्रस्त, कशी असेल टीम इंडियाची अंतिम 11?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/22/5972d40254bb083509cdfbc2c2c8c7d1_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IND vs SL, 1st T20: काही दिवसांपूर्वी भारताने वेस्ट इंडीज (IND vs WI) संघाला आधी एकदिवसीय आणि नंतर टी20 मालिकेत व्हाईट वॉश दिला. त्यानंतर आता भारतीय भूमीतच श्रीलंका भारताविरुद्ध (IND vs SL) सामने खेळण्यासाठी आली असून आजपासून टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. आज पहिला सामना लखनौच्या मैदानात खेळवला जाणार असून यावेळी संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळेल याची सर्वाधिक उत्सुकता आहे. कारण संघातील काही महत्त्वाचे खेळाडू दुखापतीमुळे मालिकेला मुकणार असल्याने या मालिकेत आता कोणाला संधी मिळेल हे आज स्पष्ट होईल, पण अंदाजे कोणत्या खेळाडूंना संधी मिळेल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल सारखे खेळाडू आधीच दुखापतग्रस्त असल्याने टीम इंडियातून बाहेर पडले आहेत. आता सूर्यकुमार आणि दीपक चहर देखील दुखापतग्रस्त झाल्याने संघाच्या अडचणीत वाढ होणार आहे. विशेष म्हणजे विराट कोहली आणि ऋषभ पंत हे देखील श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत खेळणार नाही. त्यामुळे भारताची अंतिम 11 खालीलप्रमाणे असू शकते.
भारताची संभाव्य अंतिम 11
ऋतुराज गायकवाड, ईशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, रवींद्र जाडेजा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल
भारत विरुद्ध श्रीलंका टी-20 मालिकेचं वेळापत्रक:
पहिला टी-20 सामना- 24 फेब्रुवारी
दुसरा टी-20 सामना- 26 फेब्रुवारी
तिसरा टी-20 सामना- 27 फेब्रुवारी
हे देखील वाचा-
- युवराज सिंगकडून कोहलीला 'खास शूज' गिफ्ट, म्हणतो,'जगासाठी तू किंग पण आमच्यासाठी चीकू'
- IND vs SL : भारताचा सूर्यकुमार स्पर्धेबाहेर जाताच श्रीलंकेचाही महत्त्वाचा खेळाडू कोरोनाबाधित, टी20 मालिकेला मुकणार
- वेंकटेश अय्यरच्या रुपात Team India ला मिळाला नवा फिनीशर, हार्दिक पंड्याला घेऊन मीम्स व्हायरल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)