![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
युवराज सिंगकडून कोहलीला 'खास शूज' गिफ्ट, म्हणतो,'जगासाठी तू किंग पण आमच्यासाठी चीकू'
Yuvraj Singh Letter to Virat Kohli: टीम इंडियाचा माजी स्टार खेळाडू युवराज सिंगने विराट कोहलीला एका खास प्रकारचे शूज गिफ्ट केले आहेत. त्यानं एक खास लेटरही लिहिलं आहे.
![युवराज सिंगकडून कोहलीला 'खास शूज' गिफ्ट, म्हणतो,'जगासाठी तू किंग पण आमच्यासाठी चीकू' Yuvraj Singh wrote Letter and gifted Gold shoes to Virat Kohli युवराज सिंगकडून कोहलीला 'खास शूज' गिफ्ट, म्हणतो,'जगासाठी तू किंग पण आमच्यासाठी चीकू'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/22/aafa43f533932b567c2c874a5c4f909f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Yuvraj Singh Letter to Virat Kohli: टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने विराट कोहलीला चक्क सोन्याचे शूज गिफ्ट म्हणून दिले आहेत. युवराजने विराटच्या सुवर्ण कारकिर्दीसाठी अशाप्रकारचे शूज गिफ्ट म्हणून दिले असून सोबत एक भावनिक पत्रही लिहिलं आहे. या पत्रासोबत युवराजने विराट आणि त्याचा एक जुना फोटोही सोबत शेअर केला आहे. दरम्यान ही सारी पोस्ट युवराजने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट देखील केली आहे.
युवराजने त्याच्या अधिकृत सोशल मीडियावर तीन फोटो शेअर केले आहेत. यात सोन्याचे शूज, लेटर आणि युवराजचा विराटसोबतचा एक जुना फोटो युवीने शेअर केला आहे. युवराजने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ''विराट, मी तुला एक क्रिकेटर आणि एक व्यक्तीच्या रुपात विकसीत होताना पाहिलं आहे. नेट्समध्ये एका युवा मुलापासून ते भारतीय क्रिकेटमधील एक दिग्गज असा तुझा विकास होताना मी पाहिलं आहे. तू नव्या पीढीचं नेतृत्त्व करणारा एक दिग्गज आहे.'' या पत्रात विराटने आणखीही भावनिक गोष्टी लिहिल्या असून, ''तू माझ्यासाठी कायम चीकूच राहशील भलेही जगासाठी किंग कोहली असलास तरी.'' विराटला लहाणपणीपासून लाडाने चीकू म्हणतात.
विराटकडे सर्वांचं लक्ष
युवराज सिंग आणि विराट कोहली यांची मैत्री बरीच जुनी आणि पक्की आहे. विराटने नुकतंच संघाचं कर्णधारपद सोडलं असून तो त्याची शंभरावी कसोटी आता श्रीलंका संघाविरुद्ध खेळणार आहे. 4 मार्चपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेत विराटकडे अनेकांचे लक्ष असेल. कर्णधारपद सोडल्यानंतर त्याची ही पहिलीच कसोटी असणार आहे. दरम्यान त्याच्या शतकाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
हे देखील वाचा-
- वेंकटेश अय्यरच्या रुपात Team India ला मिळाला नवा फिनीशर, हार्दिक पंड्याला घेऊन मीम्स व्हायरल
- IPL 2022: चेन्नईच्या संघानं सुरेश रैनाचा शेअर केलेला व्हिडिओ पाहून चाहते भडकले
- IND vs SL, 1st T20: वेस्ट इंडीजला नमवल्यानंतर आता भारत श्रीलंकेविरुद्ध सज्ज, कधी, कुठे पाहाल पहिला टी20 सामना?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)