IMO 2022: इंटरनॅशनल मॅथेमेटिक ऑलिम्पियाड भारतानं सुवर्णपदकासह 6 पदकं जिंकली!
International Mathematical Olympiad: यावर्षी नार्वे येथे 6 जुलै- 16 जुलै 2022 दरम्यान आंतरराष्ट्रीय मॅथेमेटिक ऑलिम्पियाड (IMO 2022) स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
International Mathematical Olympiad: यावर्षी नार्वे येथे 6 जुलै- 16 जुलै 2022 दरम्यान आंतरराष्ट्रीय मॅथेमेटिक ऑलिम्पियाड (IMO 2022) स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जिथे एकूण 104 देश सहभागी झाले होते. या स्पर्धेत भारतानं 6 पदक जिंकून 24 वा क्रमांक पटकावलाय. ज्यात एक सुवर्णपदक आणि पाच कांस्यपदकांचा समावेश आहे. बेंगळुरूमधील प्रांजल श्रीवास्तवनं आंतरराष्ट्रीय मॅथेमेटिक ऑलिम्पियाडमध्ये सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकलंय. आंतरराष्ट्रीय मॅथेमेटिक ऑलिम्पियाडमध्ये सलग तीन सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय आहे.
आंतरराष्ट्रीय मॅथेमेटिक ऑलिम्पियाड स्पर्धा यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यासाठी टीआयएफआरनं ट्वीट केलंय. "हे सांगताना आनंद होत आहे की, आंतरराष्ट्रीय मॅथेमेटिक ऑलिम्पियाड 2022 मध्ये भारतानं एक सुवर्णपदक आणि पाच कास्यपदक जिंकली आहेत. प्रांजल, अरूण, आदित्य, अतुल, वेदांत आणि कौस्तव यांचं अभिनंदन! आंतरराष्ट्रीय मॅथेमेटिक ऑलिम्पियाडमध्ये प्रांजलनं सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकून हॅट्रिक नोंदवली."
ट्वीट-
या स्पर्धेपूर्वी एचबीसीएसईनं प्रांजल, अतुल, अर्जुन, आदित्य, वेदांत आणि कौस्तव आंतरराष्ट्रीय मॅथेमेटिक ऑलिम्पियाडमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतील, अशी माहिती दिली होती. ऑलिम्पियाड परीक्षा ही जगातील सर्वात लोकप्रिय परीक्षांपैकी एक आहे. या परीक्षांनी पंधरा वर्षांहून अधिक काळ विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक क्षमता आणि अनेक विषयांतील ज्ञानाचं मूल्यांकन करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं.
हे देखील वाचा-
- Vice President Election 2022 : उपराष्ट्रपतीपदासाठी अल्वा विरुद्ध धनकड; उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस
- Covid-19 : देशात दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत घट, 15 हजार 528 नवे रुग्ण, 25 रुग्णांचा मृत्यू
- Cloudburst : हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये ढगफुटी, जनजीवन विस्कळीत; अनेक संसार ढिगाऱ्याखाली