(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ICC Awards 2021 : आयसीसीचे 2021 वर्षांतील सर्व पुरस्कार जाहीर, वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर
ICC Awards 2021 : आयसीसीने 2021 वर्षांतील सर्वोत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये केवळ एका भारतीय खेळाडूचा समावेश आहे.
ICC Awards 2021 : आंतरराष्ट्रीय तसचं स्थानिक क्रिकेटच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं वर्ष ठरलं 2021. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, आयसीसी टी20 विश्वचषक या मोठ्या स्पर्धांसह दोन भागात झालेली आयपीएल, इतर देशांच्या स्थानिक लीग अशा अनेक एकापेक्षा एक क्रिकेट स्पर्धा वर्षभरात पार पडल्या. दरम्यान या विविध स्पर्धांमध्ये उल्लेखणीय कामगिरी करणाऱ्या त्या त्या प्रकारातील खेळाडूंचा सन्मान आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात आयसीसीने (ICC) केला आहे. आयसीसीने नुकतीच विविध प्रकारातील पुरस्कारांची यादी जाहीर केली असून यामध्ये भारताच्या वाट्याला केवळ एकच पुरस्कार आला आहे. तो म्हणजे भारताची महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हीला आयसीसी महिला क्रिकेटर ऑफ द इयर (ICC Womens Cricketer of the Year) होण्याचा सन्मान मिळाला आहे.
तर हे पुरस्कार पटकावण्यात पाकिस्तानने उत्तम कामगिरी केली आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला आयसीसी पुरुष गटातील सर्वोत्कृष्ट एकदिवसीय खेळाडूचा (ICC Mens ODI Cricketer of the Year), सलामीवीर मोहम्मद रिझवानला आयसीसी टी20 प्लेयर ऑफ इयर (ICC T20 Player Of Year) आणि शाहीन आफ्रिदीला पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर असा सन्मान मिळाला आहे. याशिवाय पाकिस्तानची महिला क्रिकेटपटू फातिमा सना (Fatima Sana) हीला 'आयसीसी इमर्जिंग वूमन क्रिकेटर 2021' ने सन्मानित करण्यात आलं आहे. तर या संपूर्ण पुरस्कारांच्या यादीवर एक नजर...
- आयसीसी मेन्स टी20 क्रिकेटर ऑफ द इयर - मोहम्मद रिझवान (पाकिस्तान)
- आयसीसी वुमन्स टी20 क्रिकेटर ऑफ द इयर - टॅमी ब्यूमोंट (इंग्लंड)
- आयसीसी मेन्स इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर - जनेमन मलान (दक्षिण आफ्रिका)
- आयसीसी वुमन्स इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर - फातिमा सना (पाकिस्तान)
- आयसीसी मेन्स असोसिएट क्रिकेटर ऑफ द इयर - जिशान मकसूद (ओमान)
- आयसीसी वुमन्स असोसिएट क्रिकेटर ऑफ द इयर - आंद्रे झेपडा (ऑस्ट्रीया)
- आयसीसी मेन्स वनडे क्रिकेटर ऑफ द इयर - बाबर आझम (पाकिस्तान)
- आयसीसी वुमन्स वनडे क्रिकेटर ऑफ द इयर - लीझल ली (दक्षिण आफ्रिका)
- आयसीसी मेन्स टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर - जो रुट (इंग्लंड)
- आयसीसी वुमन्स क्रिकेटर ऑफ द इयर - स्मृती मंधाना (भारत)
- आयसीसी मेन्स क्रिकेटर ऑफ द इयर - शाहीन आफ्रिदी (पाकिस्तान)
- आयसीसी अम्पायर ऑफ द इयर - मारेस इरास्मस
हे देखील वाचा-
- ICC Mens ODI Cricketer of the Year: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यंदाचा आयसीसी ODI क्रिकेटर
- ICC T20I Player of Year: पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानचं मोठं यश, आयसीसी टी20 प्लेयर ऑफ द इयर म्हणून जाहीर
- ICC T20 World Cup 2022 : आयसीसीकडून टी20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर; टीम इंडियाचं शेड्यूल पाहा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha