एक्स्प्लोर

IPL Mini Auction 2023: आयपीएल ऑक्शनमध्ये खेळाडूंची खरेदी कशी करतात? कशाच्या आधारावर बोली लावली जाते? संपूर्ण माहिती

IPL Mini Auction 2023: आयपीएलच्या सोळाव्या हंगामाची तयारी सुरू झालीय. येत्या 23 डिसेंबरला मिनी ऑक्शनचा कार्यक्रम पार पडणार आहे.

IPL Mini Auction 2023: आयपीएलच्या सोळाव्या हंगामाची तयारी सुरू झालीय. येत्या 23 डिसेंबरला मिनी ऑक्शनचा कार्यक्रम पार पडणार आहे. पण आयपीएल ऑक्शनमध्ये खेळाडूंची खरेदी कशी केली जाते आणि कशाच्या आधारावर खेळाडूंवर बोली लावली जाते? हे कदाचित क्वचितच लोकांना माहिती असेल. आयपीएलच्या आगामी मिनी ऑक्शनपूर्वी याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आयपीएल ऑक्शन सुरूहोण्यापूर्वीच बीसीसीआयकडून शॉर्टलिस्ट केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करते. मोठ्या प्रमाणात खेळाडू रजिस्ट्रेशन करतात, पण त्याच खेळाडूंना शार्टलिस्ट केलं जातं, ज्या खेळाडूंना खेरदी करण्यासाठी फ्रँचायझी उस्तुक असते. या सर्व खेळाडूंची बेस प्राईज निश्चित केली जाते. बेस प्राईज 20 लाखांपासून दोन कोटीपर्यंत असते, जी खेळाडू स्वत: निश्चित करू शकतात. 

ऑक्शनमध्ये वेगवेगळ्या खेळाडूंचा गट

ऑक्शनसाठी खेळाडूंना वेगवेगळ्या गटात ठेवलं जातं. ब्रेस पाईज आणि खेळाडूंच्या स्कीलच्या आधारावर गट तयार केलं जातं. ज्यात गोलंदाज, स्पिनर्स, ऑलराऊंडर्स, फलंदाज आणि विकेटकिपर यांचा गट तयार केला जातो. याशिवाय, कॅप्ड आणि अनकॅप्ड खेळाडूंचाही गट तयार केला जातो.

बिडिंग वॉर म्हणजे काय?

 फ्रँचायझी खेळाडूंचा संघात समावेश करण्यासाठी त्याच्यावर बोली लावतात.अखेरपर्यंत बोली लावणाऱ्या संघात संबंधित खेळाडूचा समावेश केला जातो. जेव्हा एखाद्या खेळाडूवर त्याच्या ब्रेस प्राईजपेक्षा अधिक बोली लावली जाते, त्याला बिडिंग वॉर असं म्हटलं जातं. 

अनसोल्ड खेळाडू कोणाला म्हणातात?

ऑक्शनदरम्यान ज्या खेळाडूंवर बोली लावली जात नाही, त्यांना अनसोल्ड खेळाडू म्हटलं जातं.ऑक्शनच्या शेवटी या खेळाडूंसाठी त्वरित बोली लावली जाते, ज्यामध्ये संपूर्ण प्रक्रिया खूप वेगवान असते. यात बोली लावण्यासाठी खूप कमी वेळ असतो आणि बहुतेक खेळाडू त्यांच्या बेस प्राईजवरच विकले जातात.

कोणत्या खेळाडूकडं किती रक्कम शिल्लक

1) सनरायजर्स हैदराबाद
सनराइजर्स हैदराबादने केन विल्यमसनसह एकूण 12 खेळाडूंना रिलीज केलं आहे. ज्यामुळे आगामी आयपीएल 2023 च्या लिलावावेळी त्यांच्याकडे सर्वाधिक म्हणजेच 42.25 कोटी असणार आहेत. एकूण 12 खेळाडूंना त्यांनी रिलीज केलं आहे.

2) पंजाब किंग्स
दुसरीकडे पंजाब संघाने एकूण 10 संघाला रिलीज केलं आहे. यानंतर संघाकडे एकूण 3 परदेशी खेळाडूंची जागा शिल्लक आहेत. आता टीमकडे एकूण 7.05 कोटी पर्समध्ये शिल्लक आहेत. हा पैसा त्यांना मिनी लिलावात वापरता येणार आहे.

3) लखनौ सुपरजायंट्स
मागील वर्षी उपांत्य फेरीत पोहोचलेल्या लखनौ सुपर जायंट्सने यावेळी काही खेळाडूंना सोडले असून त्यांची एकूण पर्स व्हॅल्यू 23.35 कोटी इतकी झाली आहे. संघात एकूण 4 विदेशी खेळाडूंचे स्थान शिल्लक आहे.

4) मुंबई इंडियन्स
आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असूनही आयपीएल 2022 मध्ये मुंबईने अत्यंत खराब कामगिरी केली. त्यामुळे आता आगामी हंगामापूर्वी (IPL 2023) मुंबईने आपल्या संघात मोठे बदल केले आहेत. लिलावापूर्वी मुंबईने संघातील एकूण 13 खेळाडूंना रिलीज केलं आहे. ज्यामुळे मिनी ऑक्शनमध्ये मुंबईकडे 20.55 कोटी रुपये शिल्लक असणार आहेत.

5) चेन्नई सुपर किंग्स
चेन्नई संघाने ख्रिस जॉर्डन आणि अॅडम मिल्नेसारखे खेळाडू सोडले आहेत. आता टीमकडे एकूण 20.45 कोटी रुपयांची पर्स शिल्लक आहे. त्याच वेळी, संघाकडे एकूण 2 परदेशी खेळाडूंचे स्लॉट शिल्लक आहेत.

6) दिल्ली कॅपिटल्स
दिल्ली कॅपिटल्सने शार्दुल ठाकुरला केकेआरला ट्रेड केलं आहे. ज्यानंतर त्यांच्याकडे 19.45 कोटी इतके रुपये शिल्लक आहेत. तर 2 परदेशी खेळाडूंचे स्लॉट शिल्लक आहेत.

7) गुजरात टायटन्स
आयपीएल 2022 जिंकणाऱ्या गुजरात टायटन्सने लॉकी फर्ग्यूसन आणि रहमनुल्ला गुरबाज यांना ट्रेड केलं आहे. ज्यानंतर टीमकडे एकूण 19.25 कोटी रुपए शिल्लक आहेत. तर 3 परदेशी खेळाडूंचे स्लॉट शिल्लक आहेत.

8) राजस्थान रॉयल्स
राजस्थान रॉयल्स संघाकडे खेळाडूंना रिलीज केल्यावर 13.20 कोटी इतकी पर्स वॅल्यू असून 4 परदेशी खेळाडूंची जागा शिल्लक आहे.

9) रॉयल चँलेंजर्स बंगळुरु
रॉयल चँलेंजर्स बंगळुरुकडे 8.75 कोटी रुपये शिल्लक असून 3 परदेशी खेळाडूंची जागा शिल्लक आहे.

10) कोलकाता नाईट रायडर्स
केकेआरने लॉकी फोर्ग्युसन, शार्दुल ठाकूर आणि रहमानउल्ला गुरबाज यांचा ट्रेडद्वारे संघात समावेश केला आहे. यानंतर, संघाकडे 7.05 कोटी रुपये शिल्लक आहेत, जे सर्व संघांमध्ये सर्वात कमी आहे. त्याचबरोबर संघात 3 विदेशी खेळाडूंचे स्लॉटही उपलब्ध आहेत. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचे तर विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट, वादळी पावसाची शक्यता
मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचे तर विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट, वादळी पावसाची शक्यता
EPF बॅलेन्स कसं तपासायचं, 'हे' आहेत सर्वांत सोपे चार पर्याय; जाणून घ्या...
EPF बॅलेन्स कसं तपासायचं, 'हे' आहेत सर्वांत सोपे चार पर्याय; जाणून घ्या...
'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
Gurucharan Singh : 'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला; चौकशीदरम्यान म्हणाला,
'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला; चौकशीदरम्यान म्हणाला,"दुनियादारी सोडून..."
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 90 : टॉप 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 18 May 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09.00 AM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 May 2024 : ABP MajhaPm Modi Vs Uddhav Thackeray : नकली शिवसेनेवरून उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी यांच्यात आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचे तर विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट, वादळी पावसाची शक्यता
मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचे तर विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट, वादळी पावसाची शक्यता
EPF बॅलेन्स कसं तपासायचं, 'हे' आहेत सर्वांत सोपे चार पर्याय; जाणून घ्या...
EPF बॅलेन्स कसं तपासायचं, 'हे' आहेत सर्वांत सोपे चार पर्याय; जाणून घ्या...
'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
Gurucharan Singh : 'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला; चौकशीदरम्यान म्हणाला,
'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला; चौकशीदरम्यान म्हणाला,"दुनियादारी सोडून..."
Alka kubal :अल्का कुबल निवडणुका लढवणार का? अभिनेत्रीच्या उत्तराने वेधलं लक्ष, म्हणाल्या, 'राजकारण माझ्या रक्तात...'
अल्का कुबल निवडणुका लढवणार का? अभिनेत्रीच्या उत्तराने वेधलं लक्ष, म्हणाल्या, 'राजकारण माझ्या रक्तात...'
Kiran Mane :  लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या पक्षाकडून आली होती ऑफर, पण उद्धवजींसोबत... ; किरण मानेंचा मोठा गौप्यस्फोट
लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या पक्षाकडून आली होती ऑफर, पण उद्धवजींसोबत... ; किरण मानेंचा मोठा गौप्यस्फोट
Rakhi Sawant Health Updates : रुग्णालयात दाखल झाल्यानंतर राखी सावंतने स्वत: दिली हेल्थ अपडेट, म्हणाली गर्भाशयात गाठ आता...
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर राखी सावंतने स्वत: दिली हेल्थ अपडेट, म्हणाली गर्भाशयात गाठ आता...
गडचिरोली पोलिसांनी असा रचला सापळा; 20 लाखांच्या देशी-विदेशी दारुसह दोघांना अटक
गडचिरोली पोलिसांनी असा रचला सापळा; 20 लाखांच्या देशी-विदेशी दारुसह दोघांना अटक
Embed widget