एक्स्प्लोर

घटस्फोटानंतरही स्वत:ला रोखू शकला नाही; नताशाची पोस्ट अन् हार्दिक पांड्याची कमेंट, काय म्हणाला?

Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: हार्दिक पांड्या आणि नताशाच्या या निर्णयानंतर गेल्या काही दिवसांपासून दोघंही सोशल मीडियावर कायम चर्चेत आहेत.

Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा स्टॅनकोविकने (Natasha Stankovic) यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 18 जुलै रोजी सोशल मीडियावर पोस्ट करत हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकने घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली.

हार्दिक पांड्या आणि नताशाच्या या निर्णयानंतर गेल्या काही दिवसांपासून दोघंही सोशल मीडियावर कायम चर्चेत आहेत. सध्या हार्दिक पांड्या टीम इंडियासोबत श्रीलंकेत आहे. तर नताशा मुलगा अगस्त्यसोबत मायदेशी परतली आहे. यावेळी नताशा अगस्त्यसोबत विविध ठिकाणी फिरताना दिसत आहे. तिने याबाबत फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोवर आता हार्दिक पांड्यानेही कमेंट केली आहे. 

हार्दिक पांड्या स्वत:ला रोखू शकला नाही-

आपल्या मुलाचे फोटो पाहून हार्दिक पांड्याही स्वतःला रोखू शकला नाही आणि त्याने नताशाच्या पोस्टवर कमेंट केली आहे. हार्दिक पांड्याने त्याच्या एक्स पत्नी आणि लाडक्या मुलाच्या या फोटोंवर कमेंट करताच या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. एका पोस्टमध्ये हार्दिकने हार्ट आयकॉन शेअर केला आहे. हार्दिक पांड्याने कमेंट केल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे.
घटस्फोटानंतरही स्वत:ला रोखू शकला नाही; नताशाची पोस्ट अन् हार्दिक पांड्याची कमेंट, काय म्हणाला?

चार वर्षांचा संसार मोडला-

हार्दिक पांड्याने 31 मे 2020 रोजी मॉडेल-अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकशी लग्न केले होते. दोघांनी त्याच वर्षी 30 जुलै रोजी मुलाला जन्म दिला. लग्नाच्या जवळपास तीन वर्षांनी हार्दिक आणि नताशाने फेब्रुवारी 2023 मध्ये उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात पुन्हा लग्न केले. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने उदयपूरमधील डेस्टिनेशन वेडिंगमध्ये या जोडप्याने त्यांच्या लग्नाच्या विधींची पुनरावृत्ती केली. यावेळी जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. 14 फेब्रुवारी रोजी ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्नाचे विधी पार पडले होते. एका दिवसानंतर दोघांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले होते.

हार्दिक पांड्याच्या चुकीची शिक्षा नताशा भोगतेय?

रेडिटवरील एका पोस्टद्वारे हार्दिक आणि नताशाचं घटस्फोटाचं कारण जाणून न घेता नेटकऱ्यांनी नताशाला दोष देण्यास सुरुवात केली आहे. मात्र यामध्ये हार्दिक पांड्याची चुकी आहे, असा दावाही करण्यात आला आहे. हार्दिक पांड्याचे विवाहबाह्य संबंध होते आणि हेच घटस्फोटामागील महत्वाचं कारण ठरलंय. सदर पोस्ट करणाऱ्याने म्हटलंय की, नताशासोबत लग्न झाल्यानंतर हार्दिक पांड्याने सर्व जुन्या सवयी सोडल्या होत्या. मात्र 2023 पासून हार्दिकने इतर मुलींसाठी नताशाची फसवणूक सुरु केली. यावेळी नताशाने हार्दिक पांड्याला रंगेहाथ पकडलं आणि खऱ्या अडचणी सुरु झाल्या.  यानंतर दोघांनीही एकमेकांची बदनामी न करता शांततेत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. ही माहिती मला त्यांच्यासोबत राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या व्यक्तीने दिली, असा दावाही या पोस्टद्वारे करण्यात आला आहे.

संबंधित बातमी:

हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटानंतर नताशाची पहिली पोस्ट; भारताबाहेर गेल्यावर काय करतेय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget