एक्स्प्लोर

Hardik Pandya : विमानतळावर मिठी अन् मैदानावर वाद, हार्दिक पांड्या अन् अभिषेक नायर यांच्यात नेमकं काय घडलं?

Hardik Pandya : हार्दिक पांड्या अन् सहायक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्यात चौकारावरुन वाद झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. सरावाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडली.

कोलंबो :  भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन टी 20 सामन्यांच्या (T20 Series) मालिकेला 27 जुलैपासून सुरुवात होणार आहे. सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) कर्णधारपदी आणि शुभमन गिलची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली होती. हार्दिक पांड्याचं नाव कर्णधारपदाच्या शर्यतीत असताना निवड समिती आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सूर्यकुमार यादवची निवड केली. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टी 20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचा प्रमुख सदस्य होता. हार्दिक पांड्याची उपकर्णधारपदी टी 20 वर्ल्ड कपमध्ये निवड करण्यात आली होती. वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी केल्यानं हार्दिक पांड्याचं नाव रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आघाडीवर होतं. मात्र, सूर्यकुमार यादवला कर्णधार करण्यात आलं. अखेर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतीय संघ  श्रीलंकेत दाखल झाला आहे. काल भारतीय संघानं गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात सराव सत्रात सहभाग घेतला. यावेळी हार्दिक पांड्या आणि अभिषेक नायर (Abhishek Nayar) यांच्यात मतभेद झाले. अखेर एका पत्रकारानं हा वाद सोडवला. 

हार्दिक पांड्या आणि अभिषेक नायरमध्ये काय घडलं?  

हार्दिक पांड्या तीन सामन्यांच्या टी 20  मालिकेत खेळणार आहे. एकदिवसीय सामन्यातून हार्दिक पांड्यानं माघार घेतली आहे. टी 20 मलिकेसाठी सराव सत्रात हार्दिक पांड्या सहभागी झाला होता. हार्दिक पांड्या आणि गौतम गंभीर यांनी सरावसत्रात चर्चा केली. त्यानंतर हार्दिकनं यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांना गोलंदाजी केली. हार्दिक पांड्यानं यानंतर अभिषेक नायर यांच्या निरिक्षणाखाली फलंदाजी केली. Revsportz च्या पत्रकारानं यासंदर्भातील माहिती दिली आहे. 

हार्दिक पांड्यानं पॉईंटला फटका मारला होता. हार्दिकनं तो चौकार असल्याचा दावा केला. अभिषेक नायर यांनी तो चौकार नसल्याचं म्हटलं. या मुद्यावरुन हार्दिक पांड्या आणि अभिषेक नायर यांच्यामध्ये मतभेद झाले. पॉईंटवर असलेल्या पत्रकाराची मदत घेण्याचा निर्णय घेतला गेला. संबंधित पत्रकारानं चौकार असल्याचं सांगितलं अनं वादावर पडदा पडला. 

27 जुलैपासून टी 20 मालिका सुरु 

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळणार आहे. आगामी टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन भारतात केलं जाणार आहे. या वर्ल्ड कपच्या तयारीचा भाग म्हणून पूर्णवेळ कॅप्टन भारतीय संघाला असावा या भूमिकेतून सूर्यकुमार यादवची निवड करण्यात आली आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या कार्यकाळाची देखील सुरुवात या मालिकेपासून होणार आहे. सध्या गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात टीम इंडियाची यंग ब्रिगेड सराव सत्रात सहभागी झाली होती.सं

संबंधित बातम्या :

टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी न गेल्यास पाकिस्तानाला फायदा होणार; महत्वाची माहिती आली समोर

Mohammad Shami : शमी त्या आरोपामुळं कोलमडून गेलेला,पहाटे चार वाजता 19 व्या मजल्यावर तो गॅलरीत उभा होता, मित्रानं सगळं सांगितलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked: पोलिसांना पहिला क्लू सापडला, चोर कोणत्या मार्गाने सैफच्या घरात शिरला, प्रायमरी थिअरीतला अंदाज काय?
सैफच्या बिल्डिंगच्या मागे तुटलेली जाळी दिसताच पोलिसांच्या डोक्यातली चक्रं फिरली, पहिला क्लू सापडला?
Sanjay Raut : हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
Saif Ali Khan Attacked: तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं
करिना अन् लहानग्या मुलांच्या सुरक्षेसाठी सैफ चोराला भिडला, पाठीत वार झाला पण शेवटपर्यंत लढला
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacked : सैफवर प्राणघातक हल्ला, मानेवर 10 सेंटीमीटरची जखम,पाठीतही वारABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 16 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-Supriya Sule Saif ALi Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, सुप्रिया सुळेंचा करिश्मा कपूरला फोनSaif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked: पोलिसांना पहिला क्लू सापडला, चोर कोणत्या मार्गाने सैफच्या घरात शिरला, प्रायमरी थिअरीतला अंदाज काय?
सैफच्या बिल्डिंगच्या मागे तुटलेली जाळी दिसताच पोलिसांच्या डोक्यातली चक्रं फिरली, पहिला क्लू सापडला?
Sanjay Raut : हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
Saif Ali Khan Attacked: तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं
करिना अन् लहानग्या मुलांच्या सुरक्षेसाठी सैफ चोराला भिडला, पाठीत वार झाला पण शेवटपर्यंत लढला
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan Attack : वांद्रेतील तीन घटनांचा उल्लेख, मुंबईत दहशतीचा प्रयत्न, सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर प्रियांका चतुर्वेदी काय म्हणाल्या?
सर्व घटना वांद्रेमध्येच का? सैफ अली खानवर हल्ला हा मुंबईत दहशत पसरवण्याचा प्रकार : प्रियांका चतुर्वेदी
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
Saif Ali Khan : सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Embed widget