एकटा रोहित ट्रॉफी जिंकून देऊ शकत नाही, टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूचं वक्तव्य, विजयाचा मार्ग देखील सांगितला
T-20 World Cup : आगामी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा पहिला सामना 5 जूनला होणार आहे. भारतानं 2007 मध्ये पहिल्या वर्ल्डकपमध्ये विजय मिळवला होता.
नवी दिल्ली : आयपीएलचा (IPL 2024) समारोप झाल्यानंतर लगेचच टी-20 वर्ल्ड कप (T20 Cricket) सुरु होत असल्यानं क्रिकेट रसिकांसाठी मोठी पर्वणी आहे. वेस्ट इंडिज आण अमेरिका यांच्याकडून टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात येणारआहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार असून त्यांना पाच गटांमध्ये विभागण्यात आलंय. भारतीय क्रिकेट संघ अ गटात आहे. भारतासोबत या गटात पाकिस्तान, कॅनडा, अमेरिका आणि आयरलँडचा समावेश आह. भारताची पहिली मॅच 5 जूनला होणार आहे. आगामी टी-20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर भारताला पहिला टी-20 वर्ल्डकप मिळवून देणाऱ्या संघाचा सदस्य असलेल्या खेळाडूनं रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि टीम इंडियाबाबत (Team India) मोठं वक्तव्य केलं आहे. पहिल्या टी-20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा सदस्य असणाऱ्या हरभजन सिंगनं (Harbhajan Singh) एकटा रोहित शर्मा विजय मिळवून देऊ शकत नाही, असं म्हटलंय. भारतानं काय केलं तर विजय मिळू शकतो याबाबत त्यादेखील त्यानं भाष्य केलंय.
हरभजन सिंग काय म्हणाला?
भारतानं पहिल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये अंतिम फेरीच्या लढतीत पाकिस्तनला पराभूत करत विजय मिळवला होता. भारताच्या त्या टीमचा सदस्य असलेल्या हरभजन सिंगनं रोहित शर्मा आणि टीम इंडियानं धोनीनं ज्या प्रकारे सर्वांना सोबत घेत सांघिक कामगिरी करत विजेतेपद मिळवलं तशा प्रकारे खेळल्यास विजय मिळू शकतो असं म्हटलं.
हरभजन सिंगनं अलकीडेच एका मुलाखतीत यावर भाष्य केलंय. भारताचा सध्याच्या कॅप्टन रोहित शर्मा यानं धोनीच्या पावलावर पाऊल टाकत सांघिक कामगिरीली प्राधान्य देणं महत्त्वाचं असल्याचं म्हटलं.
रोहित शर्मा एकटा आपल्याला वर्ल्ड कप जिंकून देऊ शकत नाही. मी नाही आपण सर्व अशी भावना ठेवणं भारतीय टीमसाठी आवश्यक असल्याचं हभजन सिंग म्हणाला. आपण किंवा आम्ही या भावनेनं खेळल्यास आपण मोठी गोष्ट मिळवू शकतो, असं हरभजन सिंग म्हणाला.
आयपीएल स्पर्धा थकवणारी
हरभजन सिंगनं आयपीएल स्पर्धेच्या स्वरुपावर देखील भाष्य केलं. हरभजन सिंग म्हणाला की प्रामाणिकपणे सांगायचं तर आयपीएलचं स्वरुप थकवणार आहे. आयपीएल खेळल्यानंतर खेळाडूंमध्ये थकवा जाणवतो याचा परिणाम भारताच्या टी-20 वर्ल्ड कपमधील कामगिरीवर देखील होऊ शकतो, असं हरभजन सिंग म्हणाला.
आयपीएल ही थकवणारी स्पर्धा आहे, प्रवास हे देखील गोष्ट थकवा आणणारी आहे. खेळाडू मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या थकेलेले असतात, असं हरभजन सिंग म्हणाला.
वर्ल्ड कपपेक्षा मोठं काही नसतं, तिथं तुम्हाला तुमचं बेस्ट योगदान द्यायचं असतं. तुम्हाला ज्या दिवशी मॅच असेल त्या दिवशी चांगली बॉलिंग, बॅटिंग आणि फील्डिंग करावी लागेल, असं हरभजन सिंग म्हणाला.वर्ल्ड कप जिंकणं सोपं नसतं, तुम्हाला मानसिक दृष्ट्या मजबूत असणं आवश्यक आहे, असं हरभजन सिंग म्हणाला.
संबंधित बातम्या :
राजस्थानचा सलग चौथा पराभव, पंजाबने 5 विकेटनं लोळवलं, सॅम करनचे अर्धशतक