Happy Birthday Smriti Mandhana: हॅपी बर्थडे स्मृती मानधना! तिच्या 25 व्या वाढदिवसानिमित्त काही खास गोष्टींवर एक नजर
Happy Birthday Smriti Mandhana: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार स्मृती मानधना आज तिचा 25 वा वाढदिवस साजरा करत आहे.
Happy Birthday Smriti Mandhana: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार स्मृती मानधना आज तिचा 25 वा वाढदिवस साजरा करत आहे. स्मृती गेल्या काही वर्षांपासून भारतीय महिला संघातील प्रमुख खेळाडू बनली आहे. स्मृतीनं तिच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातलीय. पिंक बॉल कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी स्मृती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू आहे. वयाच्या 17 व्या वर्षी स्मृतीनं एकदिवसीय स्वरूपातील क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकावलं होतं. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरलीय.
स्मृती मानधनाचा जन्म 19 जुलै 1996 रोजी मुंबईत झाला. तिच्या वडिलांचं नाव श्रीनिवास आणि आईचं नाव स्मिता आहे. स्मृती मंधानाच्या कुटुंबात आई-वडिलांशिवाय एक भाऊ आहे. त्याचं नाव श्रावण मानधना आहे. मानधना दोन वर्षांची असताना तिचं संपूर्ण कुटुंब सांगलीतील माधवनगर येथे स्थलांतरित झालं होतं.
वयाच्या अकराव्या वर्षी भारताच्या अंडर-19 संघात निवड
स्मृतीनं सांगलीच्या माधवनगर येथेच शिक्षण घेतलं. लहानपणापासून तिला खेळाची आवड होती. त्यानंतर तिनं भारतासाठी क्रिकेट खेळण्यासाठीचा प्रवास सुरू केला. लहानपणी स्मृती तिच्या भावासोबत क्रिकेट खेळायची. त्यावेळी स्मृती भारताच्या अंडर-15 संघात क्रिकेट खेळाची. भावाच्या सल्ल्यानंतर स्मृतीनं क्रिकेटमध्ये भविष्य घडवण्याचं ठरवलं आणि ट्रेनिंगला सुरुवात केली. तिचं कुटूंब आणि नातेवाईकांनीही तिला प्रोत्साहन दिलं. त्यानंतर वयाच्या अकराव्या वर्षी तिची भारताच्या अंडर-19 संघात निवड झाली.
स्मृतीची देशांतर्गत क्रिकेटमध्ये 224 धावांची खेळी
स्मृतीनं 2013 मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करून दाखवली. तिनं गुजरातविरुद्ध 150 चेंडूत 224 धावा केल्या. एकदिवसीय सामन्यात दुहेरी शतक झळकावणारी स्मृती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. त्यानंतर 2016 मध्ये स्मृती मानधनानं वुमन चॅलेंजर ट्राफीत इंडिया रेडकडून खेळताना तीन अर्धशतक झळकावले.
बांग्लादेशविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण
मानधनानं बांग्लादेशविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय. त्यानंतर 2014 मध्ये इंग्लंडविरुद्ध सामना खेळला. महिला क्रिकेट विश्वचषकातील अंतिम सामन्यात भारतीय संघानं धडक दिली होती, त्यावेळी स्मृती मानधना भारतीय संघाचा भाग होती.
हे देखील वाचा-