Happy Birthday Kuldeep Yadav: अपयशानं खचला, तेव्हा थेट आत्महत्येचा निर्णय घेतला; कुलदीप यादवच्या आयुष्यातील थरार
Happy Birthday Kuldeep Yadav: उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे जन्मलेल्या कुलदीपनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 मार्च 2017 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केलंय.
Happy Birthday Kuldeep Yadav: भारताचा चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवचा आज त्याचा 27वा वाढदिवस साजरा करीत आहे. उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे जन्मलेल्या कुलदीपनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 मार्च 2017 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केलंय. कुलदीपच्या जीवनात अनेक चढ-उतार आल्याचं त्यानं सांगितलंय. एवढेच नव्हेतर, या काळात कुलदीपनं आत्महत्या करण्याचाही निर्णय घेतला होता. त्यानं स्वत: एका मुलाखतीत याचा खुलासा केलाय.
कुलदीप यादव 13 वर्षाचा असताना यूपी अंडर-15 संघात त्याला खेळायचं होतं. मात्र, त्याची निवड न झाल्यानं तो नैराश्यात गेला होता. त्यावेळी त्यानं आत्महत्या करण्याचा विचार मनात आणला होता. एका वाहिनीवरील मुलाखतीत त्यानं बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. "अडंर- 15 संघात निवड व्हावी, यासाठी खूपच मेहनत घेतली होती. पण निवड झालीच नाही. तेव्हा मी खूप निराश झालो होतो. आत्महत्येचा विचारही केला होता. पण, वडिलांनी नैराश्यातून बाहेर काढले", असं कुलदीप यादवनं सांगितलंय.
100 विकेट्स घेण्याचा विक्रम
कुलदीपनं क्रिकेटच्या तिनही प्रकारात पाच विकेट घेतल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो दुसरा फलंदाज आहे. तर एकमेव फिरकीपटू. अशी कामगिरी भुवनेश्वर कुमारने केली आहे. वनडे, कसोटी आणि टी-20 मध्ये पाच विकेट घेणारा तो जगातील फक्त तिसरा फिरकी गोलंदाज आहे. कुलदीप वगळता दक्षिण आफ्रिकेचा इमरान ताहीर आणि श्रीलंकेचा अजंता मेंडिस यांनी ही कामगिरी केलीय. याशिवाय, भारताकडून एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद 100 विकेट्स घेण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन हॅट्ट्रिक घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरलाय.
कुलदीपची मर्यादीत षटकाच्या क्रिकेटमधील कामगिरी
कुलदीप यादवनं मर्यादीत षटकाच्या क्रिकेटमध्ये 65 एकदिवसीय आणि 22 टी-20 सामने खेळले आहेत. त्यानं एकदिवसीस क्रिकेटमध्ये 28.35 च्या सरासरीनं 65 विकेट्स घेतले आहेत. तर, टी-20 मध्ये 14.22 च्या सरासरीनं 41 विकेट्स घेतले आहेत. त्यानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5.23 आणि टी-20 मध्ये 7.15 च्या इकोनॉमीनं गोलंदाजी केलीय.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-