एक्स्प्लोर

रिझवान-हैदर अलीची विस्फोटक फलंदाजी, पाकिस्तानचा वेस्ट विंडिजवर 63 धावांनी विजय

PAK vs WI : मोहम्मद रिझवान आणि हैदर अलीच्या विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने पहिल्या टी-20 सामन्यात वेस्ट विंडिजचा दारुण पराभव केलाय.

PAK vs WI : मोहम्मद रिझवान आणि हैदर अलीच्या विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने पहिल्या टी-20 सामन्यात वेस्ट विंडिजचा दारुण पराभव केलाय. कराची येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात पाकिस्तानने वेस्ट विंडिजचा 63 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने निर्धारित 20 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात 200 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल मैदानात उतरलेल्या वेस्ट विंडिजचा डाव 19 षटकांत फक्त 137 धावांत संपुष्टात आला. 

प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तान संघाने मोहम्मद रिझवान 78 आणि हैदर अलीच्या 68 धावांच्या विस्फोटक अर्धशतकी खेळीच्या बळावर 200 धावांचा डोंगर उभा केला. मोहम्मद रिझवान याने 52 चेंडूत दहा चौकारांच्या मदतीने 78 धावांची खेळी केली. तर हैदर अलीने चार षटकार आणि सहा चौकारांच्या मदतीने 39 चेंडत 68 धावांचा पाऊस पाडला. त्याशिवाय अखेरच्या षटकात मोहम्मद नवाज याने 10 चेंडूत दोन षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने 30 धावा काढल्या. या तीन फलंदाजांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. कर्णधार बाबर आझमला खातेही उघडता आले नाही. फखार जमान आणि असिफ अली यांनाही आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. वेस्ट विंडिजकडून रोमिरिओ शेफर्ड याने सर्वाधिक दोन बळी घेतले. अकेल हुसेन, ओशेन थॉमस आणि स्मिथ यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. 

पाकिस्तानने दिलेल्या 201 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या वेस्ट विंडिजची सुरुवात निराशाजनक झाली. अवघ्या एका धावेवर सलामीवीर फलंदाज ब्रँडोन किंग बाद झाला. शाय होप आणि निकोलस पुरन यांनाही आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. शाय होपने 31 धावांची तर पुरन याने 18 धावांची खेळी केली. याशिवाय कायरॉन पॉवेल याने 23 धावांची खेळी केली. शाय होपचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 धावांचा टप्पा ओलांडचा आला नाही. शाय होप यानेही संथ फलंदाजी केली. होपने 31 धावांसाठी 27 चेंडू खर्च केले. पाकिस्तानकडून मोहम्मद वासिम याने सर्वाधिक चार बळी घेतले. तर शादाब खान याने तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. शाहीन आफ्रिदी, मोहम्मद नवाज आणि हॅरिस रौफ यांनी प्रत्येकी एक एक बळी घेतला.

नामदेव कुंभार हे मागील नऊ ते दहा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. क्रीडा, राजकारण, समाजकारण, शेती, चित्रपट, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये आवड आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Yashasvi Jaiswal Catch : मागे धावला, हवेत झेपावला अन् एका हाताने यशस्वी जैस्वालने अशक्य असा कॅच पकडला! टीम इंडियाचे सगळे खेळाडू चकित, कॉनवेही पाहतच राहिला, VIDEO
मागे धावला, हवेत झेपावला अन् एका हाताने यशस्वी जैस्वालने अशक्य असा कॅच पकडला! टीम इंडियाचे सगळे खेळाडू चकित, कॉनवेही पाहतच राहिला, VIDEO
IND vs NZ 2nd Test Day-3 Stump : जुरेलची एकाकी झुंज, टीम इंडियाची लाज वाचवली! बुमराहचीही प्रतीक्षा संपली; तरी न्यूझीलंडच वरचढ, तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?
जुरेलची एकाकी झुंज, टीम इंडियाची लाज वाचवली! बुमराहचीही प्रतीक्षा संपली; तरी न्यूझीलंडच वरचढ, तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?
IND vs NZ 2nd Test : आकाश दीप OUT, प्रसिद्ध कृष्णा IN! मोहम्मद सिराजकडे पुन्हा दुर्लक्ष, गंभीरच्या निर्णयाने नवा वाद पेटला, आर अश्विनचा टोमणा, नेमकं काय म्हणाला?
आकाश दीप OUT, प्रसिद्ध कृष्णा IN! मोहम्मद सिराजकडे पुन्हा दुर्लक्ष, गंभीरच्या निर्णयाने नवा वाद पेटला, आर अश्विनचा टोमणा, नेमकं काय म्हणाला?
Ind Squad vs SL T20I Series : 95 षटकार, 91 चौकार अन् 498 चेंडू, 1089 धावा! संपूर्ण जगाला वेड लावणारा वैभव सूर्यवंशी आता श्रीलंकेविरुद्ध अ‍ॅक्शनमध्ये दिसणार, कधी होणार संघाची घोषणा?
95 षटकार, 91 चौकार अन् 498 चेंडू, 1089 धावा! संपूर्ण जगाला वेड लावणारा वैभव सूर्यवंशी आता श्रीलंकेविरुद्ध अ‍ॅक्शनमध्ये दिसणार, कधी होणार संघाची घोषणा?

व्हिडीओ

Majha Katta Sanjay Mone Ashok Mulye : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, अभिनेता संजय मोने माझा कट्ट्यावर
Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime News: 8 वर्षीय चिमुरडीवर 60 वर्षीय नराधम वृद्धाकडून अत्याचार; हात पाय तोडण्याची दिली धमकी अन्..., नागपुरातील शॉकींग घटना
8 वर्षीय चिमुरडीवर 60 वर्षीय नराधम वृद्धाकडून अत्याचार; हात पाय तोडण्याची दिली धमकी अन्..., नागपुरातील शॉकींग घटना
Devendra Fadnavis Delimitation Bill: शरद पवारांच्या मनधरणीसाठी काँग्रेस नेते मुंबईत; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला
शरद पवारांच्या मनधरणीसाठी काँग्रेस नेते मुंबईत; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला
ठाकरेंच्या शिवसेनेचे शिल्लक राहिलेले खासदारही फुटणार आहेत; उदय सामंतांचं मोठं वक्तव्य, संजय राऊतांवर पलटवार
ठाकरेंच्या शिवसेनेचे शिल्लक राहिलेले खासदारही फुटणार आहेत; उदय सामंतांचं मोठं वक्तव्य, संजय राऊतांवर पलटवार
वर्षभरानंतर ओंकार हत्ती कुटुंबात पोहोचला, कळपाशी मनोमिलन, सिंधुदुर्ग गोवा भटकंती 'आपल्या प्राण्यांत'
वर्षभरानंतर ओंकार हत्ती कुटुंबात पोहोचला, कळपाशी मनोमिलन, सिंधुदुर्ग गोवा भटकंती 'आपल्या प्राण्यांत'
Solapur Crime News: मध्यरात्री दीडच्या सुमारास सख्ख्या भावानेच भावावर कुऱ्हाडीने वार केले; सोलापुरातील तरूणाचा मृत्यू, कारणंही समोर, नेमकं काय घडलं?
मध्यरात्री दीडच्या सुमारास सख्ख्या भावानेच भावावर कुऱ्हाडीने वार केले; सोलापुरातील तरूणाचा मृत्यू, कारणंही समोर, नेमकं काय घडलं?
Devendra Fadnavis: दक्षिणेच्या 75 खासदारांनी समर्थन दिलंय, शरद पवारांच्या पक्षाबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पाठिंब्याबाबत स्पष्टच बोलले
दक्षिणेच्या 75 खासदारांनी समर्थन दिलंय, शरद पवारांच्या पक्षाबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पाठिंब्याबाबत स्पष्टच बोलले
Delimitation bill Shivsena: भाजपने डिलिमिटेशनसाठी खासदारांची जुळवाजुळव केली, पण उद्धव ठाकरेंची एक खेळी सगळं गणित बिघडवणार? सहा फुटीर खासदारांनाही व्हीप बजावला, उल्लंघन केल्यास...
भाजपने डिलिमिटेशनसाठी खासदारांची जुळवाजुळव केली, पण उद्धव ठाकरेंची एक खेळी सगळं गणित बिघडवणार? सहा फुटीर खासदारांनाही व्हीप बजावला, उल्लंघन केल्यास...
Delimitation bill Congress: पिक्चर अभी बाकी है ब्रो! डिलिमिटेशन विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी वेगवान हालचाली, काँग्रेस नेत्याचं सूचक ट्विट
पिक्चर अभी बाकी है ब्रो! डिलिमिटेशन विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी वेगवान हालचाली, काँग्रेस नेत्याचं सूचक ट्विट
Embed widget