एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Ind vs ENG, Day 4, Innings Highlights : इंग्लंडच्या फलंदाजांकडून अप्रतिम खेळाचं दर्शन, रुट-जॉनीची तुफान फटकेबाजी, विजयासाठी 119 धावांचीच गरज

IND vs ENG, 5th Test, Edgbaston Stadium: भारताने इंग्लंडला दिलेले 378 धावांचे आव्हान इंग्लंड वेगाने पूर्ण करत असून चौथ्या दिवशीचा खेळ संपताना इंग्लंडची स्थिती 259/3 अशी होती.

IND vs ENG, Day 4 Highlights : कसोटी क्रिकेटमध्ये अनेकदा पाहायला मिळत नाही अशी फटकेबाजी आज इंग्लंड संघाने दाखवली. भारतीय संघ आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या कसोटी सामन्यातील शेवटच्या डावात इंग्लंडने 378 धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी केवळ तीन विकेट्स गमावत 259 धावा केल्या आहेत. यावेळी आधी अॅलेक्स आणि जॅक यांनी चांगली सुरुवात केली. नंतर त्या दोघांसह ऑलीही बाद झाला. पण मग जो रुट आणि जॉनी बेअरस्टो यांनी अत्यंत धमाकेदार खेळी केली. त्यामुळे आता अखेरच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 119 धावांची गरज असून त्यांच्या हातात सात विकेट्सही शिल्लक आहेत.

सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने गोलंदाजी घेतली. ज्यानंतर भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली पण निम्मा संघ बाद झाला असताना ऋषभ पंतने 146 आणि रवींद्र जाडेजाने 104 धावा केल्यामुळे भारताने 416 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली, पण जॉनी बेअरस्टो (104) याचं शतक संघासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलं. पण, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडचा संघ 61.1 षटकांत 284 धावांत संपुष्टात आला. पहिल्या डावात भारताने 132 धावांची आघाडी घेतली. ज्यानंतर दुसरा डाव खेळायला आलेल्या भारताच्या फलंदाजांना खास कामगिरी करता आली नाही. सर्वत फलंदाज स्वस्तात माघारी परतले. पण पुजारा आणि पंत यांची अर्धशतकं संघासाठी महत्त्वाच्या ठरली. यावेळी पंतने (Rishabh Pant) 86 चेंडूत 57 तर पुजाराने (Cheteshwar Pujara) 168 चेंडूत 66 धावा केल्यामुळेच भारत 245 धावा करु शकला. ज्यामुळे आता इंग्लंडसमोर 378 धावांचे एक तगडे लक्ष्य भारताने ठेवले.

त्याचा पाठलाग करताना इंग्लंडकडून सलामीवीर अॅलेक्स आणि जॅक यांनी दमदार सुरुवात केली. पण अॅलेक्स 56 तर जॅक 46 धावा करुन बाद झाला. नंतर ओली शून्य धावांवर बाद झाला. बुमराहने ऑली आणि जॅकला बाद केलं. तर अॅलेक्स धावचीत झाला. त्यानंतर मात्र जो रुट आणि जॉनी यांनी तुफान फटकेबाजी केली. जो रुटने 112 चेंडूत 9 चौकारांसह नाबाद 78 धावा लगावल्या असून जॉनीने 87 चेंडूत 8 चौकारांसह एक षटकार ठोकत नाबाद 72 धावा लगावल्या. ज्यामुळे इंग्लंडचा स्कोर 259 वर तीन बाद असून आता अखेरच्या दिवशी विजयासाठी त्यांना 119 धावांची गरज आहे.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहितीEKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? 28 Nov 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Wardha Crime : दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
सरकारी नोकरीची संधी, विविध 234 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
सरकारी नोकरीची संधी, विविध 234 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
Embed widget