एक्स्प्लोर

गौतम अदानींची पु्न्हा आयपीएलमध्ये एन्ट्री; तगडी टीम खरेदी करण्याच्या तयारीत, बोलणी सुरु

Gautam Adani IPL Team: अदानी समूहाचे अध्यक्ष आणि आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी पुन्हा एकदा आयपीएलमध्ये एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे.

Gautam Adani IPL Team: देशातील दोन सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यात आता थेट आयपीएलच्या मैदानातही स्पर्धा होण्याची शक्यता आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष आणि आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी पुन्हा एकदा आयपीएलमध्ये एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. अदानी समूह आयपीएलमधील फ्रँचायझी गुजरात टायटन्समधील भागभांडवल खरेदी करण्याची शक्यता आहे.

गुजरात टायटन्स विकत घेण्याची तयारी

ET च्या अहवालानुसार, खाजगी इक्विटी फर्म CVC कॅपिटल पार्टनर्स IPL फ्रेंचायझी गुजरात टायटन्समधील आपला हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे. यासाठी तिची अदानी समूहाशी चर्चा सुरू आहे.  CVC कॅपिटल पार्टनर्स IPL फ्रँचायझी गुजरात टायटन्समधील त्यांचे कंट्रोलिंग स्टेक विकण्यासाठी अदानी ग्रुप आणि टोरेंट ग्रुपसोबत बोलणी करत आहेत. याचा अर्थ CVC कॅपिटलला फ्रँचायझीमधील बहुसंख्य हिस्सा विकायचा आहे आणि काही हिस्सा स्वतःकडे ठेवायचा आहे. 

मूल्य किती असणार?

गुजरात टायटन्स ही आयपीएलच्या नवीन फ्रँचायझींपैकी एक आहे. या तीन वर्षे जुन्या फ्रँचायझीचे मूल्य 8 हजार ते 12 हजार कोटी रुपयांच्या दरम्यान असू शकते. CVC कॅपिटलने 2021 मध्ये ही IPL फ्रेंचाइजी 5,625 कोटी रुपयांना विकत घेतली होती. अदानी समूहानेही त्यावेळी आयपीएलची अहमदाबाद फ्रँचायझी विकत घेण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा अदानी समूहाने 5,100 कोटींची बोली लावली होती. तथापि, अदानी समूहाने संभाव्य कराराबाबत सुरू असलेल्या चर्चेबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही.

अदानी समूहाकडे याआधी कोणती टीम होती?

अदानी समूह आधीच क्रीडा क्षेत्रात, विशेषतः क्रिकेटमध्ये अस्तित्वात आहे. अदानी समूहाकडे महिला प्रीमियर लीग आणि UAE-आधारित आंतरराष्ट्रीय लीग T20 मध्ये संघ आहेत. अदानी समूहाने सर्वाधिक 1,289 कोटी रुपयांची बोली लावून वुमन्स प्रीमियर लीगची अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली होती. आता सीव्हीसी कॅपिटलसोबत अदानी समूहाचा करार झाला तर आयपीएलच्या पुढच्या हंगामात अदानी आणि अंबानी यांच्यातील स्पर्धा क्रिकेटच्या मैदानावरही पाहायला मिळू शकते.

IPL 2025 च्या मेगा लिलावात नवीन नियम?

2022 मध्ये झालेल्या मेगा लिलावावर नजर टाकल्यास एकूण 204 खेळाडूंवर बोली लावण्यात आली होती. या 204 खेळाडूंची एकूण किंमत 551 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. आयपीएल तसेच क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे 2025 च्या मेगा लिलावात खेळाडूंची संख्या आणखी वाढू शकते. अध्यक्ष अरुण धुमाळ यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक संघाला 3 ते 4 खेळाडू ठेवण्याची परवानगी असेल. फ्रँचायझी जास्तीत जास्त 25 खेळाडू खरेदी करू शकते, त्यापैकी 8 परदेशी खेळाडू आहेत, परंतु एक संघ या 8 परदेशी खेळाडूंपैकी केवळ 4 खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देतो. टी-20 विश्वचषक 2024 च्या यशस्वी आयोजनानंतर, हे देखील शक्य आहे की अमेरिकेसह इतर अनेक देशांचे खेळाडू देखील लिलावात आपला दावा करू शकतात.

संबंधित बातम्या:

सूर्यकुमारचं थेट नाव घेणं टाळलं, पण गौतम गंभीरच्या एका वाक्याने निवड समितीही बुचकळ्यात पडली; रिपोर्टमध्ये महत्वाचे खुलासे!

हार्दिकने कोणतीही चुकीची गोष्ट केली नव्हती, गंभीरची वेगळी रणनीती असेल, पण...; मोहम्मद कैफ रोखठोक बोलला!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08PM 14 January 2025ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 14 January 2025Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलंAjit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Embed widget