Virushka Anniversary 2022: हॅप्पी एनिवर्सरी विरुष्का; विराट-अनुष्काच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण, किंग कोहलीची खास पोस्ट
Virushka Anniversary 2022: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) लग्नाला आज 5 वर्षे पूर्ण झाली आहेत.
Virushka Anniversary 2022: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) लग्नाला आज 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त विराटनं त्याची पत्नी अनुष्का शर्मासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना एक खास संदेश लिहिलाय. कोहलीनं 11 डिसेंबर 2017 मध्ये अनुष्कासोबत इटलीत लग्न केलं. त्यांचा विवाह सोहळा पूर्णपणे कौटुंबिक होता. त्यात फार कमी लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. विराट कोहली हा क्रिकेटविश्वातील स्टार फलंदाज आहे. तर, अनुष्का शर्मा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
विराटची इन्स्टाग्राम पोस्ट-
View this post on Instagram
विराट- अनुष्काची प्रेम कहाणी
विराट कोहलीनं त्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर खास पो्स्ट लिहली. "तुला मिळवून मी खूप धन्य झालोय. माझं मनापासून तुला प्रेम." कोहली आणि अनुष्का खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पण सुरुवातीला त्यांनी आपल्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. मात्र, त्यानंतर दोघांनीही त्यांच्या नात्याचा जाहीरपणे स्वीकार केला. यानंतर विराट आणि अणुष्कानं डिसेंबर 2017 मध्ये इटलीत लग्न केलं. लग्न आटोपल्यानंतर भारतात परतल्यानंतर दोघांनी दिल्ली आणि मुंबईत मोठ्या पार्टीचं आयोजन केलं होतं, ज्यात आपल्या सर्व प्रियजनांना आमंत्रित केलं होतं.
तब्बल तीन वर्षानंतर विराटच्या बॅटमधून निघालं एकदिवसीय शतक
बांगलादेशच्या विरुद्धच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीनं त्याच्या शतकांचा दुष्काळ संपवला. त्यानं ऑगस्ट 2019 मध्ये अखेरचं एकदिवसीय शतक झळकावलं होतं. तब्बल 1 हजार 214 दिवसानंतर विराट कोहलीनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक ठोकलं आहे.
हे देखील वाचा-