श्रीलंकेच्या संघाला ड्रेसिंग रूममधून तणावपूर्ण वातावरणात काढलं बाहेर; पहिल्या कसोटी सामन्याआधी काय घडलं?
England vs Sri Lanka: बेन स्टोक्स आणि जॅक क्रॉली यांनी श्रीलंकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून माघार घेतली आहे.
England vs Sri Lanka: इंग्लंड विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिका अजून सुरू झाली नव्हती, पण ही मालिका त्याआधीच चर्चेत आहे. वास्तविक, या मालिकेतील पहिला सामना 21 ऑगस्ट रोजी ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळवला जाणार आहे, परंतु त्यापूर्वी सराव सत्रादरम्यान एक विचित्र घटना घडली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ड्रेसिंग रूममध्ये फायर अलार्म वाजल्याने श्रीलंकेच्या संघाला ड्रेसिंग रूममधून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
श्रीलंकेला सुवर्णसंधी-
बेन स्टोक्स आणि जॅक क्रॉली यांनी श्रीलंकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून माघार घेतली आहे. अशा परिस्थितीत, श्रीलंकेला 2014 नंतर इंग्लंडमध्ये खेळणारी दुसऱ्यांदा कसोटी मालिका नोंदवण्याची संधी आहे. 2014 मध्ये, श्रीलंकेने कसोटी मालिकेत इंग्लंड संघाचा 1-0 ने पराभव केला होता आणि सध्या धनंजय डी सिल्वाच्या नेतृत्वाखाली सध्या श्रीलंकेचा संघ खूप चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे.
आजपासून रंगणार कसोटी मालिका-
21 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी श्रीलंकेने इंग्लंड लायन्स विरुद्ध 4 दिवसांचा सराव सामना खेळला होता, ज्यामध्ये श्रीलंकेला 7 विकेट्सने दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्या पराभवाचे कारण स्पष्ट करताना कॅप्टन डी सिल्वाने सांगितले की, इंग्लिश वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी त्याला आणखी एका सराव सामन्याची गरज आहे, परंतु त्याची मागणी फेटाळण्यात आली. आता 21 ऑगस्टपासून दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिका सुरू होणार आहे.
श्रीलंकेला आत्मविश्वास-
इंग्लंड आणि श्रीलंका क्रिकेट संघ 21 ऑगस्टपासून ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात आमनेसामने येणार आहेत. श्रीलंका या मालिकेत आत्मविश्वासाने उतरेल कारण नुकतीच त्यांनी भारताविरुद्ध घरच्या मैदानात 2-0 अशी एकदिवसीय मालिका जिंकली आहे. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका होणार असली तरी श्रीलंकेच्या खेळाडूंचा फॉर्म चांगलाच आहे.
इंग्लंड संपूर्ण संघ-
ऑली पोप (कर्णधार), गस ऍटकिन्सन, शोएब बशीर, हॅरी ब्रूक, जॉर्डन कॉक्स, बेन डकेट, डॅन लॉरेन्स, मॅथ्यू पॉट्स, जो रूट, जेमी स्मिथ, ऑली स्टोन, ख्रिस वोक्स, मार्क वुड.
श्रीलंकेचा संपूर्ण संघ-
धनंजय डी सिल्वा (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, पथुम निसांका, कुसल मेंडिस (उप-कर्णधार), अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, सदिरा समरविक्रमा, असिथा फर्नांडो, विश्व ला राजकुमार, राजू लंडन. कुमारा, निसाला थरका, प्रभात जयसूर्या, रमेश मेंडिस, जेफ्री वांडरसे, मिलन रत्नाया.
संबंधित बातमी:
एका षटकात 39 धावा ठोकल्या, गोलंदाजाला धू धू धुतला; टी-20 मध्ये नवीन विश्वविक्रम, पाहा Video