Eng Squad vs Ind 5th Test : बेन स्टोक्सचा धडाकेबाज निर्णय! फक्त 1 सामना खेळलेला खेळाडू थेट संघात, इंग्लंड बोर्डाची घोषणा
England Squad for 5th Test : इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) भारताविरुद्धच्या अँडरसन-तेंडुलकर मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटीसाठी आपला संघ जाहीर केला आहे.

England Squad for 5th Test : इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) भारताविरुद्धच्या अँडरसन-तेंडुलकर मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटीसाठी आपला संघ जाहीर केला आहे. पाचव्या कसोटीसाठी निवडलेल्या 15 सदस्यीय इंग्लंड संघाची खास गोष्ट म्हणजे त्यांनी 3 वर्षांपूर्वी कारकिर्दीतील एकमेव कसोटी खेळलेल्या खेळाडूला संधी दिली आहे. इंग्लंडने मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटीनंतर शेवटच्या कसोटीसाठी संघ जाहीर केला. इंग्लंड सध्या भारताविरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे.
शेवटच्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर
मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या डावात 311 धावांची मोठी आघाडी घेतल्यानंतर इंग्लंड विजयाच्या आशेने झुंजत होता. परंतु, भारतीय फलंदाजांनी त्यांच्या पराक्रमाने त्यांच्या आशा धुळीस मिळवल्या. परिणामी इंग्लंडला अनिर्णित खेळण्यास भाग पाडले गेले. आता अशा परिस्थितीत, ओव्हल येथे खेळला जाणारा पाचवा कसोटी सामना महत्त्वाचा बनला आहे. इंग्लंडने पाचव्या कसोटीसाठी अष्टपैलू जेमी ओव्हरटनचा संघात समावेश केला आहे.
3 वर्षांनी जेमी ओव्हरटन कसोटी संघात परतला
2022 मध्ये जेमी ओव्हरटनने इंग्लंडसाठी पदार्पण केले. त्याने न्यूझीलंडविरुद्ध लीड्स येथे कसोटी पदार्पण केले, ज्यामध्ये त्याने 2 विकेट घेतल्या आणि दोन्ही डावांमध्ये 97 धावा केल्या. पण, त्या एका कसोटीनंतर जेमी ओव्हरटन पुन्हा इंग्लंडच्या कसोटी संघाबाहेर गेला. पण आता तो 3 वर्षांनी पुन्हा परतला आहे. आणि पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचे स्थान निश्चित होण्याची शक्यता आहे.
पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ
बेन स्टोक्स (कर्णधार), जो रूट, ख्रिस वोक्स, जॅक क्रॉली, हॅरी ब्रूक, बेन डकेट, ब्रायडन कार्स, गस अॅटकिन्सन, जेमी ओव्हरटन, ऑली पोप, लियाम डॉसन, जेमी स्मिथ, जेकब बेथेल, जोफ्रा आर्चर, जोश टंग.
We've made one addition to our squad for the 5th Rothesay Test, which starts at the Kia Oval on Thursday.
— England Cricket (@englandcricket) July 28, 2025
See the squad 👇
ऋषभ पंतच्या जागी नारायण जगदीसन
चौथ्या कसोटीत दुखापतग्रस्त ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर पडला आहे. ख्रिस वोक्सचा यॉर्कर बॉल त्याच्या उजव्या बुटावर लागला, त्यानंतर स्कॅनमध्ये त्याचे फ्रॅक्चर झाल्याचे निश्चित झाले. पण, पंतने दुसऱ्या दिवशी फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि अर्धशतक झळकावले. पंतला पाचव्या कसोटीतून बाहेर काढण्यात आले आहे, त्याच्या जागी बीसीसीआयने नारायण जगदीसनचा संघात समावेश केला आहे.
'द ओव्हल'मध्ये भारतीय संघाचा कसोटी विक्रम
भारताने यापूर्वी लंडनमधील द ओव्हल (केनिंग्टन ओव्हल) मैदानावर 15 कसोटी सामने खेळले आहेत. भारताने येथे 2 कसोटी सामने जिंकले आहेत तर 7 सामने अनिर्णित राहिले आहेत. उर्वरित 6 सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला (5 वेळा इंग्लंडविरुद्ध आणि 1 वेळा ऑस्ट्रेलियाविरुद्ध).
पाचव्या कसोटीसाठी भारताचा अपडेट संघ
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन, नीतीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), करुण नायर, अभिमन्यू ईश्वरन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, अंशुल कंबोज, कुलदीप यादव. एन जगदीसन (यष्टीरक्षक).
हे ही वाचा -





















