एक्स्प्लोर

Pahalgam attack: पहलगाम हल्ल्याचा बदला, ऑपरेशन महादेवला यश, पर्यटकांना मारणारे 2 दहशतवादी ठार!

22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला करून 26 जणांना ठार मारले होते. यात एक काश्मिरी नागरिक सहभागी होता. तेव्हापासून दहशतवाद्यांचा शोध सुरू होता.

Two terrorists involved in Pahalgam attack killed in Lidmas area of Jammu and Kashmir: जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. ऑपरेशन महादेव अंतर्गत, सोमवारी (28 जुलै) पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले. तीन दहशतवाद्यांमध्ये सुलेमान शाहची ओळख पटली आहे. पहलगाम हल्ल्यात सुलेमानचा सहभाग होता. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला करून 26 जणांना ठार मारले होते. यात एक काश्मिरी नागरिक सहभागी होता. तेव्हापासून दहशतवाद्यांचा शोध सुरू होता. दरम्यान, सोमवारी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना ठार मारले.

हल्ल्यात कोणते दहशतवादी सहभागी होते?

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवादी आसिफ फौजी (कोडनेम मुसा), सुलेमान शाह (युनुस) आणि अबू तल्हा (आसिफ) यांचा सहभाग होता. इतर दोन दहशतवादी आदिल गुरी आणि अहसान हे स्थानिक दहशतवादी होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. पाकिस्तान आणि पीओकेमध्ये हल्ले करून 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. त्यानंतर युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली. आजही संसदेत ऑपरेशन सिंदूरवरून गदारोळ झाला आणि दोन्ही सभागृहात त्यावर चर्चा सुरू आहे. तिन्ही पाकिस्तानी दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. घटनास्थळावरून एक अमेरिकन बनावटीची कार्बाइन, एक AK-47 रायफल, 17 रायफल ग्रेनेड आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये सुलेमान, यासिर आणि अली यांचा समावेश आहे. पहलगाम हल्ल्यात सुलेमान आणि यासिर यांचा सहभाग होता. या भागात चौथ्या दहशतवाद्याची उपस्थिती असण्याची शक्यता आहे.

लष्कराने काय म्हटले?

श्रीनगरमधील दाचिगाम राष्ट्रीय उद्यानाजवळील हरवन परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाल्याची माहिती लष्कराने दुपारी 12:30 वाजता दिली. लष्कराच्या चिनार कॉर्प्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर लिहिले की, "ऑपरेशन महादेव - 'जनरल एरिया लिडवास' मध्ये संपर्क स्थापित झाला आहे." दुपारी 1:30 वाजता लष्कराने सांगितले की तीन दहशतवादी मारले गेले आहेत. दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी हरवनच्या मुलनार भागात कारवाई सुरू केली होती. लष्कराच्या कारवाईदरम्यान संसदेत ऑपरेशन सिंदूरची चर्चा सुरू आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सांगितले की, आमचे सरकार, आमचे सैन्य आणि आमच्या लोकशाही संस्था, सर्व मिळून देशाच्या एकता, अखंडता आणि सुरक्षेसाठी आवश्यक असलेले प्रत्येक पाऊल उचलण्यास वचनबद्ध आहेत.

महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू

22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पाहलगामजवळील बाईसरान व्हॅली येथे दहशतवाद्यांनी पर्यटक हल्ला केला. या घटनेत 26 लोक ठार झाले, ज्यात 25 पर्यटक आणि एक स्थानिकाचा समावेश होता. पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण सहा पर्यटक ठार झाले होते. यामध्ये पुणे, ठाणे/डोंबिवली, पनवेल, नागपूर येथील रहिवासी होते. त्यापैकी तीन डोंबिवलीचे हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने होते. तसेच पनवेलचे दिलीप देसले यांचा समावेश होता.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Komal Kale Reel Star Arrested : 50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
Tatkal Ticket Booking New Rule : तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Komal Kale Reel Star Arrested : 50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
Tatkal Ticket Booking New Rule : तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
निरोगी आरोग्यासाठी होलिस्टिक हीलिंगला पसंती, ही पद्धती लाखो लोकांसाठी आशेचा किरण, पतंजलीचा दावा
निरोगी आरोग्यासाठी होलिस्टिक हीलिंगला पसंती, ही पद्धती लाखो लोकांसाठी आशेचा किरण, पतंजलीचा दावा
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
Embed widget