एक्स्प्लोर

जोफ्रा परतला, विश्वचषकासाठी इंग्लंडच्या शिलेदारांची घोषणा, IPL च्या स्टार खेळाडूंना संधी!

T20 World Cup 2024 Squad : टी20 विश्वचषकासाठी इंग्लंडने आपल्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.

T20 World Cup 2024 Squad : टी20 विश्वचषकासाठी इंग्लंडने आपल्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडच्या ताफ्यात आयपीएलमध्ये (IPL 2024) धमाल करणाऱ्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्याशिवाय वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचं संघात कमबॅक झालेय. इंग्लंडच्या संघाची धुरा जोस बटलर याच्या खांद्यावर आहे, तर उपकर्णधार म्हणून मोईन अली (moeen ali ) याला निवडण्यात आले आहे. एक जून पासून टी20 विश्वचषकाला सुरुवात होत आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. त्यासाठी एक मे पर्यंत टीम निवडण्याची डेडलाईन आयसीसीनं दिली आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंडने आपल्या 15 सदस्यी संघाची घोषणा केली आहे. लवकरच भारतीय खेळाडूंचीही निवड होण्याची शक्यता आहे. 

मोईन अली उपकर्णधार

इंग्लंड क्रिकेट बोर्डानं आज विश्वचषकासाठी 15 जणांच्या चमूची घोषणा केली. त्याशिवाय पाकिस्तान दौऱ्यासाठीही याच खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. टी20 विश्वचषकाचा थरार एक जून पासून सुरुवात होणार आहे. इंग्लंडच्या संघाची धुरा फॉर्मात असलेल्या जोस बटलर याच्या खांद्यावर सोपवण्यात आली. जोस बटलर सध्या राजस्थानकडून खेळतोय. बटलरनं राजस्थानसाठी यंदा दोन शतकं ठोकली आहेत, तो सध्या भन्नाट फॉर्मात आहे. जोस बटलरने आठ आयपीएल सामन्यात 319 धावा चोपल्या आहेत. जोस बटलरशिवाय मोईन अली आणि जोफ्रा आर्चर यांनाही स्थान मिळालेय. जोफ्रा आर्चर अनेक दिवसांनंतर क्रिकेटच्या मैदानावर कमबॅक करणार आहे. जोफ्रा दुखापतग्रस्त होता, त्यामुळे मैदानाबाहेर होता. त्याशिवाय मोईन अली याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली. 

आयपीएलच्या स्टार खेळाडूंच समावेश

कोलकात्याकडून खेळणारा विस्फोटक फलंदाज फिलिप सॉल्ट यालाही इंग्लंडच्या ताफ्यात जागा मिळाली आहे. त्याशिवाय विल जॅक्स आणि जॉनी बेयरस्टो यांचीही निवड झाली आहे. दोन्ही खेळाडूंनी नुकतेच आयपीएलमध्ये शतकी धमाका केलाय. हॅरी ब्रूक आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांच्यावरही विश्वास दाखवण्यात आलाय. इंग्लंडची गोलंदाजीही मजबूत दिसत आहे. जोफ्रा आर्चरच्या साथीला मार्क वूड, रीस टॉप्ले यांचा समावेश आहे. त्याशिवाय आदिल रशीद फिरकीची धुरा संभाळणार आहे. फिलिप सॉल्ट यानं आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडलाय. त्यानं 9 सामन्यात 392 धावा केल्यात, यामध्ये चार अर्धशतकाचा समावेश आहे. सॉल्टची सर्वोच्च धावसंख्या 89 धावा इतकी आहे. फिलिप सॉल्टनेही आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली आहे.
 
टी20 वर्ल्ड कप 2024 साठी इंग्लंडच्या ताफ्यात कोण कोण ?

जोस बटलर (कर्णधार), मोईन अली (उपकर्णधार), फिल सॉल्ट, विल जॅक्स, जॉनी बेयरस्टो, हॅरी ब्रूक, लियाम लिविंगस्टोन, सॅम करन, जोफ्रा आर्चर, क्रिस जॉर्डन, मार्क वुड, रीस टॉपले, आदिल रशीद, टॉम हार्टले, बेन डकेट.

आणखी वाचा :

South Africa Team T20 World Cup : भारताचा नाही पण दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, कगिसो रबाडाला डच्चू, कुणाला संधी?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
Pune Mhada: पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaMajha Infra Vision Eknath Shinde :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडलं महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजनABP Majha Headlines : 09 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaABP Majha Headlines : 8 PM 09 Oct हेडलाईन्स एबीपी माझा ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
Pune Mhada: पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
Embed widget