(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs LEI: ऋषभ पंत जबरदस्त फॉर्ममध्ये, भारताविरुद्धचं ठोकलं अर्धशतक!
IND vs LEI: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला (Rishabh Pant) काही खास कामगिरी करता आली नाही.
IND vs LEI: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला (Rishabh Pant) काही खास कामगिरी करता आली नाही. या मालिकेत त्याला केवळ 58 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याच्यावर जोरदार टीका झाली. परंतु, इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या ऋषभ पंतनं सराव सामन्यात लिसेस्टशायरकडून खेळताना भारताविरुद्ध (Leicestershire vs India) अर्धशतक ठोकून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलंय.
भारताचे चार खेळाडू लिसेस्टशायरच्या संघात
भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर सराव सामना खेळत आहे. हा सामना इंग्लिश क्लब लिसेस्टरशायर विरुद्ध खेळला जात आहे. या सामन्यात सर्व भारतीयांना संधी मिळावी यासाठी भारताचे चार खेळाडू लीसेस्टशायर संघाकडून खेळत आहेत. ऋषभ पंत व्यतिरिक्त चेतेश्वर पुजारा, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा लिसेस्टशायर संघात समावेश करण्यात आलाय.
ऋषभ पंतनं लिसेस्टशायरच्या संघाचा डाव सावरला
लिसेस्टशायरचा संघानं 71 धावापर्यंत पोहचण्यापर्यंत चार विकेट्स गमावल्या. ऋषभ पंत आणि ऋषी पटेल यांनी लीसेस्टरशायरला 100 धावांचा टप्पा पार करून दिला. ऋषी पटेलही 34 धावा करून मोहम्मद शमीच्या जाळ्यात अडकला. त्यानंतर ठराविक अंतरानं विकेट पडत राहिल्या. 87 चेंडूत 76 धावा करून ऋषभ पंत रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर विकेट गमावली. भारताकडून मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांना प्रत्येकी दोन-दोन विकेट्स मिळाल्या.
पंतचा स्कूप-फ्लिक्स शॉट
दरम्यान, सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऋषभ पंतनं भारताविरुद्ध अर्धशतक ठोकलं. पंतनं 87 चेंडूत 76 धावांची खेळी खेळली. ज्यात एक षटकार आणि 14 चौकारांचा समावेश आहे. या खेळीदरम्यान ऋषभ पंतनं स्कूप-फ्लिक्स शॉट खेळला. पंतचा हा शॉट पाहून खेळाडूंसह मैदानातील प्रेक्षकही हैराण झाले. ऋषभच्या या शॉटचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
हे देखील वाचा-