ENG vs IND, 3rd ODI Live Streaming : आज भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील अखेरची मॅच, कधी, कुठे पाहाल सामना?
India vs England 3rd ODI : भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना आज खेळवला जाणार आहे.
![ENG vs IND, 3rd ODI Live Streaming : आज भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील अखेरची मॅच, कधी, कुठे पाहाल सामना? ENG vs IND 3rd ODI Live Streaming When Where To Watch India vs England ODI Live Telecast Online IST ENG vs IND, 3rd ODI Live Streaming : आज भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील अखेरची मॅच, कधी, कुठे पाहाल सामना?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/16/a09e20329cc8a69e1de7054c04d2ebd21657993108_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India vs England Live : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात आज तिसरा एकदिवसीय सामना (3rd ODI) सामना खेळवला जाणार आहे. मालिकेत सध्या दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत असल्याने आजचा हा सामना म्हणजे निर्णायक सामना असणार आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने तब्बल 10 विकेट्सनी विजय मिळवल्यानंतर मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली. पण दुसरा सामना इंग्लंडने 100 धावांनी जिकंत मालिकेत बरोबरी साधली. त्यामुळे आजचा सामना महत्त्वाचा आहे. आजचा सामना जिंकणारा संघ मालिका 2-1 ने जिंकले. तर हा सामना कधी, कुठे पाहता येईल याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...
कधी आहे सामना?
आज 17 जुलै रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सामना सुरु होईल. 3 वाजता नाणेफेक होईल.
कुठे आहे सामना?
हा सामना इंग्लंडच्या मँचेस्टरच्या ओल्ड ट्रेफर्ड मैदानावर खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना सोनी स्पोर्ट नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामने पाहता येणार असून सोनी लिव्ह या अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे लाईव्ह कव्हरेज पाहता येईल.
इंग्लंडविरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह
हे देखील वाचा-
- Singapore Open 2022 : सिंगापूर ओपनच्या फायनलमध्ये सिंधूसमोर चीनचं आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?
- Legends League : लवकरच सुरु होणार लेजेंड्स लीग क्रिकेटचा नवा हंगाम, सेहवागसह पठाण बंधूही उतरणार मैदानात
- IND vs ENG 1st ODI : जबरदस्त! आधी भेदक गोलंदाजी, मग संयमी फलंदाजी, भारताचा इंग्लंडवर 10 विकेट्सनी विजय
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)