एक्स्प्लोर

ENG vs IND: इंग्लंडविरुद्ध पहिला टी-20 सामना आज! रोहित शर्मा, विराट कोहलीच्या कामगिरीवर असेल सर्वांचं लक्ष

ENG vs IND 1st T20Is: बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात निराशाजनक कामगिरी केल्यानंतर भारतीय संघ इंग्लंडशी (England Vs India) तीन सामन्यांची टी- 20 मालिका खेळण्यासाठी सज्ज झालाय.

ENG vs IND 1st T20Is: बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात निराशाजनक कामगिरी केल्यानंतर भारतीय संघ इंग्लंडशी (England Vs India) तीन सामन्यांची टी- 20 मालिका खेळण्यासाठी सज्ज झालाय. या मालिकेतील पहिला टी-20 सामना आज साउथॅम्प्टनच्या रोज बाऊल येथे खेळला जाणार आहे.  येत्या ऑक्टोबर-नोव्हेबर महिन्यांत ऑस्ट्रेलियात आगामी टी-20 विश्वचषक खेळला आहे. याच पार्श्वभूमीवर इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका जिंकून भारतीय संघ आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करेल. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतीय संघानं टी-20 क्रिकेटमध्ये उत्तम प्रदर्शन करून दाखवलं. यापुढं भारत अशीच कामगिरी करेल, अशी अपेक्षा केली जात आहे. भारतीय संघासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली अतिशय महत्वाचे खेळाडू मानले जातात. भारत अडचणीत असताना या दोघांनी अनेकदा महत्वाची भूमिका बजावत संघाला विजय मिळवून दिलाय.

विराट कोहली
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. त्याला गेल्या अडीच वर्षांत तिन्ही फॉरमेटमध्ये शतक झळकावता आलं नाहीये. कोहलीनं त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा टी-20 सामना श्रीलंकाविरुद्ध फेब्रुवारीमध्ये खेळला होता. त्यानंतर आयपीएलपूर्वी विश्रांती घेतली होती. विशेष म्हणजे, आयपीएलमध्येही विराटला काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानं आयपीएल 2022 मध्ये 16 सामन्यात एकूण 341 धावा केल्या. दरम्यान, टी-20 विश्वचषकाला काहीच महिने शिल्लक राहिले आहेत. यामुळं विराट कोहलीचं फॉर्ममध्ये भारतीय संघासाठी महत्वाचं आहे.

रोहित शर्मा
विराट कोहलीसह आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्मानंही आयपीएल 2022 मध्ये निराशाजनक प्रदर्शन करून दाखवलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईच्या संघाला सलग आठ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. तर, आयपीएलच्या संपूर्ण हंगामात रोहित शर्माला फक्त 268 धावा करता आल्या आहेत. आगामी टी-20 विश्वचषकात रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करेल.  रोहित शर्माला उत्कृष्ट कर्णधार म्हटलं जातं. परंतु, त्याला संघासाठी वयैक्तिक धावाही करणं गरजेचं आहे. 

आयसीसी टी-20 विश्वचषक 2022
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल. 

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 5 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 5 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Embed widget