(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CWG 2022: कॉमनवेल्थ स्पर्धेच्या पहिल्याच क्रिकेट सामन्यात हरमनप्रीत कौरची मोठ्या विक्रमाला गवसणी
Australia Women vs India Women: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कॉमनवेल्थ स्पर्धेतील पहिला क्रिकेट सामना खेळला जातोय.
Australia Women vs India Women: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कॉमनवेल्थ स्पर्धेतील पहिला क्रिकेट सामना खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकत भारतानं ऑस्ट्रेलियासमोर 155 धावांचं लक्ष्य ठेवलंय. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौरनं 34 चेंडूत 52 धावांचं महत्वाची खेळी केली. या अर्धशतकासह हरमनप्रीत कौरनं (Harmanpreet Kaur) मोठ्या विक्रमाला गवसणी घातलीय. एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारी हरमनप्रीत कौर पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरमनप्रीत कौरचं अर्धशतक
ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करत भारतानं 20 षटकात आठ विकेट्स गमावून 154 धावा केल्या. या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेली भारताची कर्णधार 34 चेंडूत 53 धावा केल्या. या कामगिरीसह कोणत्याही संघाविरुद्ध आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी ती पहिली भारतीय महिला फलंदाज ठरलीय.
हरमनप्रीत कौरची खास क्लबमध्ये एन्ट्री
ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरमनप्रीत कौरनं 500 हून अधिक धावा केल्या आहेत. हरमनप्रीत कौरच्या व्यतिरिक्त कोणत्याही भारतीय खेळाडूला एका संघाविरुद्ध 500 धावांचा टप्पा गाठता आला नाही. या यादीत स्मृती मानधना दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिनं ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध अनुक्रमे 489 आणि 436 धावा केल्या आहेत. त्यानंतर भारताची माजी कर्णधार मिताली राज चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहे. तिनं इंग्लंडविरुद्ध 409 धावा केल्या आहेत. तर, श्रीलंकाविरुद्ध 399 धावा केल्या आहेत.
एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला फलंदाज-
क्रमांक | क्रिकेटपटू | विरुद्ध संघ | धावा |
1 | हरमनप्रीत कौर | ऑस्ट्रेलिया | 502 |
2 | स्मृती मानधना | ऑस्ट्रेलिया | 489 |
3 | स्मृती मानधना | इंग्लंड | 436 |
4 | मिताली राज | इंग्लंड | 409 |
5 | मिताली राज | श्रीलंका | 399 |
हे देखील वाचा-