पाकिस्तानच्या जर्सीवर भारताचे नाव, विश्वचषकात खेळणाऱ्या दहा संघाच्या जर्सीचे फोटो व्हायरल
World Cup Jerseys Of All Teams : क्रिकेटच्या महाकुंभाला अवघ्या तीन दिवसाचा कालावधी शिल्लक आहेत.
World Cup Jerseys Of All Teams : क्रिकेटच्या महाकुंभाला अवघ्या तीन दिवसाचा कालावधी शिल्लक आहेत. यंदाची स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने पार पडणार असून दहा संघ सहभागी होणार आहेत. 48 सामन्यानंतर क्रिकेटचा विश्वविजेता मिळेल. 5 ऑक्टोबरपासून क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. गतविजेते इंग्लंड आणि उपविजेते न्यूझीलंड यांच्यामध्ये सलामीचा सामना रंगणार आहे. 4 ऑक्टोबर रोजी ओपनिंग सरेमनी होणार आहे. सध्या प्रत्येक संघ सराव सामने खेळण्यात व्यस्त आहे. विश्वचषकात सहभागी झालेल्या सर्व संघांनी जर्सी लाँच केली आहे. भारत, पाकिस्तानसह सर्वच संघाच्या जर्सी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. प्रत्येक संघाच्या जर्सीचे वेगळे महत्व आहे. पाकिस्तानसह प्रत्येक संघाच्या जर्सीवर भारताचे नाव आहे. कारण, विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे. भारत आणि पाकिस्तानच्या जर्सीवर स्टार आहेत. भारताने दोन विश्वचषक जिंकले आहेत, त्यामुळे दोन स्टार आहेत. तर पाकिस्तानच्या जर्सीवर फक्त एक स्टार आहे. 1992 मध्ये पाकिस्तान संघाने विश्वचषक उंचावला होता.
Pakistan cricket team jersey is beautiful ۔
— کنول(مہرزادی) (@kanwalrazi20) September 20, 2023
#BabarAzam𓃵#ICCWorldCup2023 pic.twitter.com/ex7UHCSLhu
Official India's world cup jersey 2023. pic.twitter.com/Sr0Ur2KifT
— Pratham Mishra (@Pratham87313062) September 20, 2023
जर्सी सोशल मीडियावर व्हायरल -
विश्वचषकाची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. पाकिस्तानसह सर्वच संघाची जर्सी चर्चेचा विषय आहे. सोशल मीडियावर जर्सीचे फोटो व्हायरल झाले आहेत. नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
Introducing AfghanAtalan's official playing kit for the ICC Men's Cricket World Cup 2023! 🌟🤩
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) September 27, 2023
Rate it out of 10! ⚡#AfghanAtalan | #CWC23 pic.twitter.com/GbXNfgpXdi
Rate Australia's WC jersey out of 10 👇#INDvsAUS #CWC23 pic.twitter.com/uV1k8gxgwg
— Crickdom (@Crickdom7) September 22, 2023
Bangladesh world cup jersey
— Cricket97 (@cricket97bd) September 26, 2023
__ on 10#CWC2023 pic.twitter.com/qlrA3PMX2P
Team England hasn't unveiled their Official Jersey for the Cricket World Cup 2023 yet. Could this be the reason they're holding back on the game glimpse? 🏴🏏👕
— Cricket24 : Community Professionals (@Cricket24_Game) September 27, 2023
Anyone knows?
😄#Cricket24#ECB #Thebarmyarmy pic.twitter.com/0x1c0ki0B9
Netherlands Jersey for World Cup 2023. pic.twitter.com/VJVfpbUmWh
— Johns. (@CricCrazyJohns) September 25, 2023
Newzealand's new jersey 🔥 pic.twitter.com/OGrkgIsLtC
— Swabhab Panigrahi (@imswabhab) September 18, 2023
🇿🇦Cricket South Africa 🤝 @Lottosportza ⚡
— Proteas Men (@ProteasMenCSA) September 4, 2023
New season. New Kit
We welcome @Lottosportza to the CSA family 😍#BePartOfIt pic.twitter.com/QCvEwz11Xp
Sri Lanka Cricket unveil ICC Cricket World Cup 2019 Jersey. #CWC19 #lka pic.twitter.com/svQpkqtxyi
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) May 3, 2019
चेन्नईत भारत-ऑस्ट्रेलियाचा आमना सामना -
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ 8 ऑक्टोबरपासून आपल्या विश्वचषक अभियानाची सुरुवात करत आहेत. चेन्नईच्या मैदानावर दोन्ही संघामध्ये सलामीची लढत होणार आहे. त्यानंतर भारत 11 ऑक्टोबरला अफगाणिस्तानविरोधात दोन हात करेल. हा सामना दिल्लीमध्ये होणार आहे. अहमदाबादमध्ये 14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांची लढत होणार आहे.
5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाचा शुभारंभ -
5 ऑक्टोबर रोजी क्रिकेटच्या महाकुंभाला सुरुवात होणार आहे. गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात सलामीची लढत होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी महाअंतिम सामना रंगणार आहे. विश्वचषकाचा पहिला आणि अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान हा हायहोल्टेज सामनाही अहमदाबाद येथेच होणार आहे. यंदाचा विश्वचषक दहा संघामध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. प्रत्येक संघाचे कमीतकमी नऊ सामने होणार आहेत. त्यानंतर आघाडीच्या चार संघामध्ये सेमीफायनलचे सामने होणार आहेत. 19 नोव्हेंबर रोजी मेगा फायनल होणार आहे.