एक्स्प्लोर

Champions Trophy 2025 Ind vs Pak Virat Kohli-Rohit Sharma: भाईने बोला, मारने का तो मारने का! रोहितचे हातवारे अन् विराटचा निर्णय, नेमकं काय घडलं?, VIDEO

Champions Trophy 2025 Ind vs Pak Virat Kohli-Rohit Sharma: विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 51 वे शतक ठोकले. 

Champions Trophy 2025 Ind vs Pak Virat Kohli-Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेत (Champions Trophy 2025) काल (23 फेब्रुवारी) भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 6 विकेट्सने विजय मिळवला. भारताने या विजयासह चॅम्पियन्स ट्रॉफीतील उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केलं आहे. तर पाकिस्तानचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. भारताकडून विराट कोहली (Virat Kohli) याने शतक झळकावले. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 51 वे शतक ठोकले. 

रोहित शर्माचे हातवारे आणि विराट कोहलीचा खणखणीत चौकार-

भारत विजयाच्या दारावर पोहचला असताना विराट कोहली देखील आपल्या शतकाच्या जवळ पोहचला होता. भारताला विजयासाठी 2 धावा आवश्यक असताना विराट कोहलीला शतक पूर्ण होण्यासाठी 4 धावांची आवश्यकता होती. भारतीय चाहत्यांना विराट कोहलीचे शतक व्हावं, अशी इच्छा होती. यावेळी भारतीय कर्णधार रोहित शर्मा याला देखील विराट कोहलीने आपले शतक पूर्ण करावे, असं वाटत होते. संघाला विजयासाठी 2 धावांची आवश्यकता असताना कोहली 96 धावांवर खेळत होता. यावेळी ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्या रोहित शर्माने विराट कोहलीला षटकार किंवा चौकार मारुन शतक पूर्ण कर, असं हातवारे करुन सांगितले. यानंतर विराट कोहलीने खणखणीत चौकार खेचत शतक पूर्ण केले आणि भारताला विजयही मिळवून दिला. यादरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारताचा एकतर्फी विजय-

भारताने पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव केला आहे. भारताकडून विराट कोहली 100 धावांवर नाबाद राहिला. तर श्रेयस अय्यरने 56, शुभमन गिलने 46 धावा केल्या. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय आहे. प्रथम फलंदाजी केल्यानंतर पाकिस्तान संघाला फक्त 241 धावा करता आल्या. यानंतर भारतीय संघाने 42.3 षटकांत सहज विजय मिळवला.

पाकिस्तानकडून शकील अर्धशतक-

प्रथम फलंदाजी करताना बाबर आझम आणि इमाम उल हक यांनी पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी हार्दिक पांड्याने मोडली. त्याने बाबरला तंबुत पाठवले. त्याला 26 चेंडूत पाच चौकारांसह फक्त 23 धावा करता आल्या. पुढच्याच षटकात इमाम उल हकही धावबाद झाला. त्याला 26 चेंडूत फक्त 10 धावा करता आल्या. 47 धावांत दोन विकेट गमावल्यानंतर सौद शकील आणि कर्णधार मोहम्मद रिझवान यांनी पाकिस्तान डावाची धुरा सांभाळली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी केली. दरम्यान, शकीलने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील चौथे अर्धशतक झळकावले. ही भागीदारी अक्षर पटेलने मोडली. त्याने रिझवानला क्लीन बोल्ड केले. 77 चेंडूत तीन चौकारांसह 46 धावा काढल्यानंतर तो बाद झाला. 

संबंधित बातमी:

Ind vs Pak : भारत जिंकला, विराटही बरसला; 'देव मोठा की तुम्ही' असं म्हणणारा कुंभमेळ्यातील IIT बाबा तोंडावर आपटला

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार

व्हिडीओ

Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक
Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Embed widget