ICC Men’s ODI Rankings: बुमराहला मोठा धक्का! रोहित-विराटचीही घसरण, हार्दिक पांड्याची मोठी झेप
ICC Men’s ODI Rankings: आयसीसीनं जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रमावारीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) मोठा धक्का बसलाय.
ICC Men’s ODI Rankings: आयसीसीनं जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रमावारीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) मोठा धक्का बसलाय. इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय मालिकेला मुकलेला जसप्रीत बुमराहची आयसीसी गोलंदाज क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर घसरण झालीय. तर, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult) अव्वल स्थानी विराजमान झालाय. याशिवाय भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना प्रत्येकी एक-एक स्थानानी नुकसान झालंय. तर, हार्दिक पाड्यानं (Hardik Pandya) दमदार प्रदर्शनाच्या जोरावर ऑलराऊंडरच्या यादीत मोठं यश मिळवलंय.
हार्दिक पांड्याची टॉप-10 मध्ये धडक
आयसीसीनं जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रमवारीत मोठे फेरबदल पाहायला मिळाले. काही तासांपूर्वी जसप्रीत बुमराह जगातील नंबर एकदिवसीय गोलंदाज होता. पण ट्रेन्ट बोल्टनं त्याची खुर्ची खेचून घेतली आहे. याशिवाय, रोहित शर्मा आणि विराट कोहलीलाही आयसीसी क्रमवारीत मोठा फटका बसलाय. इग्लंडविरुद्ध मागील दोन्ही एकदिवसीय सामन्यात दोघांचीही बॅट शांतच होती. आयसीसीच्या ताज्या क्रमावारीनुसार, रोहित शर्माची पाचव्या आणि विराट कोहलीची चौथ्या स्थानावर घसरण झालीय. महत्वाचं म्हणजे, भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला मोठा फायदा मिळालाय. हार्दिक पांड्यानं 13 क्रमांकाची झेप घेऊन टॉप-10 मध्ये स्थान मिळवलं आहे. हार्दिक पांड्या 242 गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे.
आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल कोण?
गोलंदाजांच्या यादीत बोल्टनं 704 गुणांसह पहिल्या आणि बुमराहकडं 703 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी तिसऱ्या क्रमांकावर आहे. फलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पहिल्या आणि इमाम उल हक दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा रासी व्हेन डर डुसेन तिसऱ्या क्रमांकावर पोहचलाय. ऑलराऊंडर्सच्या यादीत बांग्लादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर मोहम्मद नबी दुसऱ्या आणि राशिद खान तिसऱ्या क्रमांकावर आहे.
हे देखील वाचा-
- South Africa T20 League: दक्षिण आफ्रिकेत होणार मिनी आयपीएल; मुंबई, चेन्नईसह 6 संघामध्ये रंगणार टी-20 क्रिकेटचा थरार!
- Washington Sundar: काऊंटी क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा, पदार्पणाच्या सामन्यातच वॉशिंग्टन सुंदरची चमकदार कामगिरी
- WI vs IND: भारताला टक्कर देण्यासाठी वेस्ट इंडीजचा संघ सज्ज- निकोलस पूरन