WI vs IND: भारताला टक्कर देण्यासाठी वेस्ट इंडीजचा संघ सज्ज- निकोलस पूरन
West Indies vs India: भारत आणि वेस्ट इंडीज (WI vs IND) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला येत्या 22 जुलै 2022 पासून सुरुवात होत आहे.
![WI vs IND: भारताला टक्कर देण्यासाठी वेस्ट इंडीजचा संघ सज्ज- निकोलस पूरन WI vs IND, India Tour Of West Indies, West Indies, India, West Indies vs India, Nicholas Pooran WI vs IND: भारताला टक्कर देण्यासाठी वेस्ट इंडीजचा संघ सज्ज- निकोलस पूरन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/20/71b226c3d98ea86b28065a5815f033361658303672_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
West Indies vs India: भारत आणि वेस्ट इंडीज (WI vs IND) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला येत्या 22 जुलै 2022 पासून सुरुवात होत आहे. बांग्लादेशविरुद्ध लाजीरवाण्या पराभवाचा सामना करणाऱ्या वेस्ट इंडीजच्या संघासमोर भारताचं मोठं आव्हान असणार आहे. परंतु, भारताला जोरदार टक्कर देण्यासाठी वेस्ट इंडीजचा संघ सज्ज झालाय, असं वेस्ट इंडीज कर्णधार निकोलस पूरननं (Nicholas Pooran) म्हटलं आहे. या वर्षी वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज कायरन पोलार्डनं संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर निकोलस पूरनकडं मर्यादीत षटकाच्या संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं.
निकोलस पूरन काय म्हणाला?
"भारतीय संघात असे काही खेळाडू आहेत, जे संघाची जबाबदारी योग्य पद्धतीनं पार पाडू शकतात. भारतीय संघात उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज आहेत, जे सामना जिंकून देऊ शकतात. परंतु, आमच्यासमोर येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना सामोरे जाण्याची आम्ही तयारी दर्शवली आहे. यातून जगालाही कळेल की, आम्ही काही कमी नाहीत."
जेसन होल्डरची संघात पुनरागमन
एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडीजचा स्टार ऑलराऊंडर जेसन होल्डरचं संघात पुनरागमन झालय. “आम्ही एकदिवसीय क्रिकेटसाठी योग्य मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत. जेव्हा आपण हे करू शकू तेव्हा सर्व काही ठीक होईल. आम्हाला प्रत्येक फॉरमॅटनुसार खेळायचं आहे", असंही पूरननं म्हटलंय.
बांग्लादेशविरुद्ध एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडीजचा लाजीरवाणा पराभव
एकेकाळी क्रिकेटविश्वावर वर्चस्व गाजवणाऱ्या वेस्ट इंडीजचा संघाला सध्या खराब फॉर्मचा सामना करावा लागत आहे. नुकतीच बांग्लादेशविरुद्ध पार पडलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 3-0 नं पराभव पत्करावा लागला होता.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)