Baramati Vidhan Sabha Election | पवार VS पवार बारामतीत कुणाची? स्थानिक पत्रकारांना काय वाटतं?
Baramati Vidhan Sabha Election | पवार VS पवार बारामतीत कुणाची? स्थानिक पत्रकारांना काय वाटतं?
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक करण्यात आलीये. या घटनेत अनिल देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. देशमुख काटोलकडे जात असताना बेलफाट्याजवल अज्ञात व्यक्तीने हा केला असल्याचे सांगितले जात आहे. हा हल्ला भाजपच्या लोकांकडून करण्यात आल्याचा आरोप अनिल देशमुख यांच्याकडून करण्यात आलाय. यानंतर अनिल देशमुख यांना काटोलच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर नागपूरसाठी रेफर करण्यात आले आहे. अनिल देशमुख यांना घेऊन त्यांचे सहकारी काटोल वरून नागपूरच्या दिशेने निघाले आहेत. दरम्यान, पक्षातील ज्येष्ठ नेत्यावर दगडफेक झाल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या























