Ind vs Ban : मोठी अपडेट! BCCI देणार इशान किशनला चुका सुधारण्याची संधी, धोनीच्या लाडक्याची घेणार जागा?
Ishan Kishan for comeback Team India Bangladesh T20Is : भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने 28 नोव्हेंबर 2023 रोजी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
Ishan Kishan for comeback Team India Bangladesh T20Is : भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने 28 नोव्हेंबर 2023 रोजी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर इशानला टीम इंडियामध्ये स्थान मिळवता आलेले नाही. देशांतर्गत स्पर्धेसाठी बीसीसीआयच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करणे इशानला चांगलेच महागात पडले. त्याला केवळ टीम इंडियातूनच काढण्यात आले नाही, तर त्याला केंद्रीय संपर्कातूनही वगळण्यात आले. मात्र, आता इशान किशनला बीसीसीआय चुका सुधारण्याची संधी देऊ शकते.
पीटीआयच्या वृत्तानुसार, बांगलादेशविरुद्धच्या 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी इशान किशनची निवड होऊ शकते. रिपोर्टनुसार, टी-20 मालिकेत धोनीच्या लाडक्या ऋषभ पंतच्या जागी इशानची निवड केली जाऊ शकते. ऋषभ पंत हा दीर्घ फॉरमॅटमध्ये भारताचा नंबर वन यष्टिरक्षक आहे. भारतीय संघाला अजूनही कसोटी सामने खेळायचे आहेत. अशा परिस्थितीत, कामाच्या ताणामुळे भारतीय निवड समिती पंतला बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेत विश्रांती देऊ शकते.
9 महिन्यांनंतर पुनरागमन करणार इशान किशन
ऋषभ पंतला बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेतून विश्रांती मिळाल्यास इशान किशन 9 महिन्यांनंतर टीम इंडियात पुनरागमन करू शकतो. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे इशान किशनला संघातून वगळण्यात आले. पण, अलीकडच्या काळात देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळेच भारतीय निवड समितीने पंतला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला तर ते इशानला संधी देऊ शकतात.
त्याचवेळी वृत्तांवर विश्वास ठेवला तर, शुभमन गिललाही या टी-20 मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते. त्यांच्याशिवाय जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनाही भारताच्या कसोटी क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे विश्रांती दिली जाऊ शकते.
इशान किशन हा भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळणारा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 2 कसोटी, 27 एकदिवसीय आणि 32 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. इशानने कसोटीच्या 3 डावात 78 धावा केल्या. याशिवाय, त्याने एकदिवसीय सामन्यांच्या 24 डावांमध्ये 42.40 च्या सरासरीने 933 धावा केल्या आहेत आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 32 डावांमध्ये 124.37 च्या स्ट्राइक रेटने 796 धावा केल्या आहेत.
हे ही वाचा -
IPL 2025 Mega Auction : बीसीसीआयने ऐकलं नाही तर... चेन्नई सुपर किंग्ज MS धोनीबाबत घेणार मोठा निर्णय?