IPL 2025 Mega Auction : बीसीसीआयने ऐकलं नाही तर... चेन्नई सुपर किंग्ज MS धोनीबाबत घेणार मोठा निर्णय?
यावेळी आयपीएल-2025 साठी मेगा लिलाव होणार आहे. बीसीसीआयने अद्याप खेळाडूंना कायम ठेवण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.
IPL 2025 Mega Auction : यावेळी आयपीएल-2025 साठी मेगा लिलाव होणार आहे. बीसीसीआयने अद्याप खेळाडूंना कायम ठेवण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जकडून मोठी माहिती समोर येत आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, चेन्नई सुपर किंग्स आता दिग्गज महेंद्रसिंग धोनीबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
फ्रँचायझी किती खेळाडूंना कायम ठेवू शकते?
बीसीसीआयने नुकतीच फ्रँचायझी मालकांची बैठक घेतली. यामध्ये टीम मालकांनी रिटेन्शन नंबर्सवर त्यांचे मत मांडले. जास्तीत जास्त 8 खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी अनेक फ्रँचायझी मालकांची इच्छा होती. त्याचबरोबर 5 किंवा 6 खेळाडूंना कायम ठेवण्याच्या बाजूने अनेकजण होते. वृत्तानुसार, काही फ्रँचायझींना एकही खेळाडू कायम ठेवण्यात रस नव्हता. आता बीसीसीआय किती खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी देते यावर अवलंबून आहे.
चेन्नई सुपर किंग्जने केली होती विशेष मागणी
अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, चेन्नई सुपर किंग्जने बीसीसीआयला बैठकीत जुना नियम परत घेऊन येण्याची विनंती केली होती. निवृत्त खेळाडूंना अनकॅप्ड खेळाडूंच्या श्रेणीत ठेवण्याचा हा नियम होता. या नियमानुसार, चेन्नई सुपर किंग्स महान भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवू शकते, ज्यामुळे त्यांना अत्यंत कमी किंमतीत महेंद्रसिंग धोनीला कायम ठेवण्याची संधी मिळू शकते.
बीसीसीआय करत आहे विचार
क्रिकबझच्या वृत्तानुसार, बीसीसीआय सप्टेंबरच्या अखेरीपर्यंत कायम ठेवण्याच्या नियमांची घोषणा पुढे ढकलणार आहे. यापूर्वी ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, बोर्ड चेन्नई सुपर किंग्जच्या विनंतीवर गंभीरपणे विचार करत आहे. कारण महेंद्रसिंग धोनीच्या आयपीएलमध्ये सातत्य ठेवल्याने केवळ फ्रँचायझीच नाही तर आयपीएललाही फायदा होईल.
चेन्नई सुपर किंग्ज घेऊ शकते मोठा निर्णय
क्रिकबझच्या या अहवालात, चेन्नई सुपर किंग्जला महेंद्रसिंग धोनीला कोणत्याही किंमतीत कायम ठेवायचे आहे, असा दावा करण्यात आला आहे. जरी बीसीसीआयने फक्त 2 खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी दिली तरी फ्रँचायझी महेंद्रसिंग धोनीलाच कायम ठेवेल.
हे ही वाचा -