(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Team India Selection Committee: चेतन शर्माकडे पुन्हा निवड समितीचं अध्यक्षपद, समितीमध्ये कुणा कुणाची वर्णी
Team India Selection Committee: बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीत काम करण्यासाठी जवळपास 600 खेळाडूंनी आपला अर्ज दाखल केला होता.
Team India Selection Committee: बीसीसीआयच्या (BCCI) राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदी (Team India Selection Committee) चेतन शर्मा (Chetan Sharma) यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीत शिवसुंदर दास, सुब्रातो बॅनर्जी, सलील अंकोला आणि श्रीधरन शरथ यांचा समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीत काम करण्यासाठी जवळपास 600 खेळाडूंनी आपला अर्ज दाखल केला होता. बीसीसीआयच्या तीनसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीकडून अकराजणांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आली आणि त्यातून पाच जणांच्या निवड समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 विश्वचषकानंतर बीसीसीआयनं चेतन शर्माच्या यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीला बरखास्त केलं होतं. पण आता पुन्हा एकदा चेतन शर्मा यांना संधी दिली आहे.
NEWS 🚨- BCCI announces All-India Senior Men Selection Committee appointments.
— BCCI (@BCCI) January 7, 2023
Mr Chetan Sharma recommended for the role of Chairman of the senior men’s selection committee.
More details 👇👇https://t.co/K5EUPk454Y
बीसीसीआयकडे आले होते 600 अर्ज -
सुलक्षणा नाइक, अशोक मल्होत्रा आणि जतिन परांजपे यांच्या सल्लागार समितीने (CAC) ने अध्यक्ष म्हणून चेतन शर्मा आणि इतर निवड समितीच्या सदस्यांची निवड केलीय निवड समितीमधील पाच सदस्यांसाठी बीसीसीआयकडे सहाशे अर्ज आले होते. बीसीसीआयकडे 18 नोव्हेंबरपर्यंत निवड समितीच्या सदस्यांसाठी अर्ज करण्यात आले होते. सल्लागार समितीनं विचारपूर्वक मुलाखतीसाठी 11 जणांची निवड केली होती. त्यानंतर चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीत शिवसुंदर दास, सुब्रातो बॅनर्जी, सलील अंकोला आणि श्रीधरन शरथ यांचा समावेश करण्यात आला.
2022 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 विश्वचषकात भारतीय संघाला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नव्हती. भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीला बरखास्त करण्यात आलं होतं. पण बीसीसीआयनं पुन्हा एकदा चेतन शर्मा यांना संधी दिली आहे.
चेतन शर्माची कारकिर्द
चेतन शर्मानं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 11 वर्षे क्रिकेट खेळलंय. यादरम्यान त्यांनी 23 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 35.45 च्या सरासरीनं 61 विकेट घेतल्या. याशिवाय, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर 65 सामने खेळण्याची नोंद आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं 34.86 च्या सरासरीनं 67 विकेट घेतल्या. विशेष म्हणजे, चेतन शर्मा हा यशपाल शर्माचा पुतण्या आहे, जो 1983 च्या विश्वचषक विजेता संघाचा भाग होता.
हे देखील वाचा-