एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 

Chhagan Bhujbal on Ajit Pawar : धनंजय मुंडे यांचा पत्ता करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे.

Chhagan Bhujbal on Ajit Pawar : शनिवारी राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी (Maharashtra Guardian Ministers List) जाहीर करण्यात आली. यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा पत्ता कट करण्यात आला. बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बीडचे पालकत्व (Beed Guardian Minister) स्वीकारावे, अशी मागणी केली जात होती. अखेर अजित पवार यांना बीडचे पालकमंत्रिपद मिळाले आहे. आता यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. 

कालपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे  ‘नवसंकल्प शिबिर’ शिर्डीत सुरु आहे. या अधिवेशनाला गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या छगन भुजबळ यांनी शनिवारी हजेरी लावली. मात्र काही वेळातच छगन भुजबळ अधिवेशन सोडून मुंबईकडे रवाना झाले. आज माध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. 

भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया

काही नेत्यांना पालकमंत्रिपदातून डावलण्यात आले. यामुळे नाराजीचे चित्र पाहायला मिळत आहे. याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, मला काही माहीत नाही. नक्की कोण नाराज आहे. मी कालच यादी वाचली असं त्यांनी म्हटले. तर बीडचे पालकमंत्रिपद अजित पवार यांनी घेतले आहे. धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला. याबाबत विचारले असता चांगली गोष्ट आहे, अशी तीन शब्दात प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. 

पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मोठ्या संघटनात्मक बदलांची तयारी सुरू आहे. पक्षाच्या कार्यकारिणीत फेरबदल करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, पार्टीचे पार्लमेंटरी बोर्ड तयार झाले पाहिजे. त्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले पाहिजे. विशेषतः जे आमदार आणि खासदारांच्या उमेदवारीचे निर्णय घेतले गेले पाहिजे. आता महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. ज्या कमिटी स्थापित केल्या जातील. त्यावर योग्य निवड झाली पाहिजे.  चारही बाजूंनी विचार केला पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

आणखी वाचा 

Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या

About the author अजय माने

अजय माने
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

2019 च्या मिस इंडिया स्पर्धेतील सुंदरीचं शुद्धीकरण, पुण्यातील सायलीची हिंदू धर्मात वापसी; खासदार-आमदारांची उपस्थिती
2019 च्या मिस इंडिया स्पर्धेतील सुंदरीचं शुद्धीकरण, पुण्यातील सायलीची हिंदू धर्मात वापसी; खासदार-आमदारांची उपस्थिती
कागदपत्रे घेतली, तरीही ज्योती वाघमारेंना माहिती नव्हतं; एकनाथ शिंदेंनी उलगडलं खासदार करण्याचं गुपित
कागदपत्रे घेतली, तरीही ज्योती वाघमारेंना माहिती नव्हतं; एकनाथ शिंदेंनी उलगडलं खासदार करण्याचं गुपित
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
मराठा समाजावर अन्याय म्हणत मराठा क्रांती मोर्चाची काळी रंगपंचमी; सोलापुरात भाजप नेत्यांविरुद्ध आक्रोश
मराठा समाजावर अन्याय म्हणत मराठा क्रांती मोर्चाची काळी रंगपंचमी; सोलापुरात भाजप नेत्यांविरुद्ध आक्रोश

व्हिडीओ

Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?

Embed widget