![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
IND vs SL, Head to Head Record : आज भारत विरुद्ध श्रीलंका 'करो या मरो'चा सामना, कसा आहे आजवरचा इतिहास?
IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यात आज तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळवला जात आहे. याआधी दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 28 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत.
![IND vs SL, Head to Head Record : आज भारत विरुद्ध श्रीलंका 'करो या मरो'चा सामना, कसा आहे आजवरचा इतिहास? India vs Sri lanka 3rd T20 to play at rajkot know team india vs Sri lanka Head to head record in t20 IND vs SL, Head to Head Record : आज भारत विरुद्ध श्रीलंका 'करो या मरो'चा सामना, कसा आहे आजवरचा इतिहास?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/07/db3ffbb6f70ce84918775ec2d02dfc111673074790311323_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India vs Sri Lanka, T20 Record : भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात आज टी20 सामना खेळवला जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील हा अखेरचा सामना असून दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत असल्याने आजचा सामना निर्णायक असणार आहे. मालिकेतील पहिला सामना भारताने 2 धावांनी जिंकला. तर दुसरा सामना एकावेळी जिंकत आला असताना अखेर भारताने 16 धावांनी गमावला. त्यामुळे ही मालिका चुरशीची सुरु असल्याने आज अखेरचा सामनाही चुरशीचा होऊ शकतो. तर या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचा आजवरचा एकमेंकाविरुद्धचा इतिहास जाणून घेऊ...
आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांचा विचार करता भारतीय संघ तब्बल 28 वेळा श्रीलंका संघाविरुद्ध (IND vs SL) मैदानात उतरला आहे. आजवर खेळवल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाचं पारडं कमालीचं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारताने 28 पैकी 18 सामन्यात विजय मिळवला आहे. तर, श्रीलंका संघाला 9 सामने जिंकता आले आहेत. तर एक सामना अनिर्णीत राहिला आहे.
कशी आहे हवामानाची स्थिती आणि पिच रिपोर्ट?
आजच्या सामन्यात पाऊस किंवा इतर कोणत्याही प्रकारे हवामान सामन्यात अडथळा आण्याची शक्यता फारच कमी आहे. Weather.com नुसार, आज राजकोटचे तापमान दिवसभरात 32 अंशांपर्यंत पोहोचेल. त्याच वेळी, रात्री ते 17 अंशांपर्यंत खाली जाईल. आकाश निरभ्र होईल. पावसाची शक्यता दिवसा फक्त 2 टक्के राहील, तर रात्री 1 टक्के कमी होईल. दिवसा आर्द्रता 46 टक्के राहील आणि रात्री 57 टक्के राहील. याशिवाय ताशी 10-15 किमी वेगाने वारे वाहतील. तसंच आजची खेळपट्टी फलंदाजांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. कारण ही सपाट खेळपट्टी गोलंदाजांसाठी अडचणी निर्माण करते. फलंदाजांना येथे फलंदाजी करणे खूप सोपे जाईल. तसंट, गोलंदाजांना योग्य लाईन आणि लेन्थवर गोलंदाजी करणं अनिवार्य असणार आहे.
कधी, कुठे पाहू शकता आजचा सामना?
भारत विरुद्ध श्रीलंका या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार Sony Liv अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
अशी असू शकते भारताची अंतिम 11सलामीवीर -शुभमन गिल, ईशान किशन
मिडिल ऑर्डर फलंदाज - सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी
ऑलराउंडर- अक्षर पटेल, हार्दिक पांड्या
गोलंदाज - शिवम मावी, हर्षल पटेल, उमरान मलिक, युजवेंद्र चहल
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)