एक्स्प्लोर

BAN vs ENG : बांगलादेशची कमाल! टी20 मालिकेत इंग्लंडला दिला व्हाईट-वॉश, ऑस्ट्रेलियानंतर अशी कामगिरी करणारा पहिलाच संघ

Bangladesh vs England : बांगलादेशनं इंग्लंडविरुद्धची अखेरची टी20 मीरपूर येथे 16 धावांनी जिंकत मालिका 3-0 ने जिंकली आहे.

Bangladesh vs England T20 Series : एकावेळी अंडरडॉग समजला जाणारा बांगलादेश क्रिकेट संघ (bangladesh Cricket team) मागील काही वर्षात सर्वच क्रिकेच प्रकारात दमदार कामगिरी करताना दिसत आहे. आता त्यांनी आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. त्यांनी इंग्लंडला टी20 मालिकेत 3-0 ने मात देत व्हाईटवॉश दिला आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियानंतर अशी कामगिरी करणारा बांगलादेश हा दुसराच संघ आहे. मंगळवारी (14 मार्च) मीरपूर येथे झालेल्या तिसऱ्या T20I सामन्यात इंग्लंडचा 16 धावांनी पराभव करत बांगलादेशनं T20I मालिकेत 3-0 असा विजय मिळवला.

इंग्लंडचा संघ बांगलादेशमध्ये मर्यादीत षटकांचे सामने खेळण्यासाठी आला होता. ज्यात  तीन एकदिवसीय आणि तीन टी20 सामने यावेळी खेळवले जाणार होती. यातील एकदिवसीय मालिका इंग्लंडनं 2-1 नं जिकली. पण त्यानंतरची टी20 मालिका 3-0 अशा दमदार फरकानं जिंकत बांगलादेशनं इतिहास रचला. यावेळी पहिल्या सामन्यात 6 विकेट्सने, दुसऱ्या सामन्या 4 विकेट्सने आणि तिसऱ्या सामन्यात 16 धावांनी जिंकत बांगलादेशनं मालिकेत इंग्लंडला क्लीनस्विप दिली आहे. 

अखेरच्या सामन्यात जोस बटलरच्या खेळाडूंनी बांगलादेशविरुद्ध प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला ज्यानंतर सलामीवीर लिटन दासच्या 57 चेंडूत 73 धावांच्या जोरावर बांगलादेशनं 2 बाद 158 धावा केल्या. प्रत्युत्तरात, यजमानांनी सुरुवात करण्यापूर्वी जोस बटलर आणि डेविड मलानच्या बळावर इंग्लंडने 13 षटकांत 1 बाद 100 धावा केल्या होत्या. वेगवान गोलंदाज तस्किन अहमदने दोन तर कर्णधार शकीब अल हसन आणि मुस्तफिजुर रहमानने प्रत्येकी एक बळी घेतला. मागील वेळीचा टी20 विश्वचषक चॅम्पियन असलेल्या इंग्लंडने सहा बाद 142 धावांवर शरणागती पत्करली. इंग्लंडला मागील नऊ वर्षांत पहिल्यांजाच टी20 मालिकेत व्हाईटवॉश मिळाला आहे. 2014 मध्ये जॉर्ज बेलीच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर 3-0 असा विजय नोंदवताना इंग्लंडला व्हाईटवॉश दिला होता. अशी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलिया पहिला संघ होता. त्यानंतर बांगलादेशनं प्रथमच अशी कामगिरी केली आहे. 2021 च्या T20 विश्वचषकापूर्वी, बांगलादेशने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला 4-1 ने नमवले आणि न्यूझीलंडला घरच्या मैदानावर 3-2 ने पराभूत केले. या विजयाने बांगलादेशच्या पूर्ण सदस्य संघाला व्हाईटवॉश देण्याचा मान पहिल्यांदाच मिळाला. 

एकदिवसीय मालिका इंग्लंडनं जिंकली

इंग्लंडचा संघ बांगलादेशमध्ये मर्यादीत षटकांचे सामने खेळण्यासाठी आला होता. तीन एकदिवसीय आणि तीन टी20 सामने यावेळी खेळवले जाणार होते. 1 मार्चपासून सुरु झालेल्या या दौऱ्यात पहिल्या तीन वन-डे सामन्यातील पहिले दोन सामने अनुक्रमे तीन विकेट्स आणि 132 धावांनी बांगलादेशनं गमावले. अखेरचा सामना 50 धाावंनी जिंकला असला तरी मालिका इंग्लंडनं 2-1 नं जिकली.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Embed widget