Virat Kohli Record : अहमदाबाद कसोटीत कोहलीची दमदार कामगिरी, नावे केला खास रेकॉर्ड
IND vs AUS: अहमदाबाद कसोटी सामन्यात विराट कोहलीने शानदार 186 धावा करून कसोटी स्वरूपातील शतकाचा दुष्काळ संपवला. त्यासाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला.
Virat Kohli Won Man of the Match : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 मधील भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात खेळला गेलेला शेवटचा सामना अनेक अर्थाने भारतीय चाहत्यांसाठी खूप खास होता. सामना अनिर्णीत संपला तरीही विराट कोहलीने (Virat Kohli) शानदार 186 धावांसह कसोटी क्रिकेटमधील 28व्या शतकाची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवली. हा सामना अनिर्णीत संपल्यानंतर कोहलीला त्याच्या या शानदार खेळीसाठी सामनावीराचा खिताबही देण्यात आला. या विजेतेपदासह, विराट कोहलीच्या नावावर जागतिक क्रिकेटमधील आणखी एका महान विक्रमाची भर पडली आहे, ज्यामध्ये तो 4 वेगवेगळ्या देशांविरुद्ध सर्व फॉरमॅटमध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा खिताब पटकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीने याआधी दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि बांगलादेशविरुद्ध सर्व फॉरमॅटमध्ये सामनावीराचा खिताब पटकावला होता.
विराट कोहलीने भारतीय खेळाडू म्हणून केलेल्या खेळीच्या जोरावर 16व्यांदा सर्व फॉरमॅटमध्ये 150 किंवा त्याहून अधिक धावा करण्यात यश मिळवलं, ज्यामध्ये त्याने माजी भारतीय खेळाडू वीरेंद्र सेहवागच्या विक्रमाची बरोबरी केली. आता कोहलीच्या पुढे, या प्रकरणात केवळ माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर 25 वेळा हा पराक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यातील शानदार खेळीमुळे विराट कोहलीला कसोटी फॉर्मेटमध्ये 10व्यांदा सामनावीराचा खिताब मिळाला. यासह, तो आता जागतिक क्रिकेटमधील पहिला खेळाडू बनला आहे, ज्याने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये हे विजेतेपद 10 किंवा त्याहून अधिक वेळा जिंकले आहे. विराटने वनडेमध्ये 38 वेळा आणि टी-20मध्ये 15 वेळा सामनावीराचा खिताब पटकावला आहे.
अखेर कसोटी शतकांचा दुष्काळ संपला
विशेष म्हणजे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटीत जवळपास 3 वर्षानंतर म्हणजे 1205 दिवसानंतर कोहलीने कसोटी शतक ठोकलं आहे. याआधी अखेरचं कसोटी शतक कोहलीने बांगलादेशविरुद्ध नोव्हेंबर 2019 मध्ये ठोकलं होतं. त्यानंतर थेट आता त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मार्च 2023 मध्ये शतक ठोकलं आहे. आजच्या डावात विराटने केवळ 5 चौकार ठोकत हे शतक केलं आहे. एकही षटकार त्याने ठोकलेला नाही. दरम्यान 2019 साली कसोटी फॉरमॅटमध्ये शेवटचे शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीची फलंदाजीची सरासरीही गेल्या 20 कसोटी डावांमध्ये खूपच खराब होती. ज्यामध्ये त्याने केवळ 25 च्या सरासरीने धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याच्या बॅटने फक्त एकदाच 50 हून अधिक धावांची खेळी पाहिली होती, जी डिसेंबर 2021 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यादरम्यान केली होती. पण आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतक ठोकल्यावर विराट पुन्हा फॉर्मात परतेल अशी आशा फॅन्सना आहे.
हे देखील वाचा-