Tamim Iqbal Announces Retirement : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी स्टार खेळाडूचा तडकाफडकी राजीनामा! सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्ती घोषणा
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर पोस्ट करत निवृत्ती माहिती दिली.
Tamim Iqbal Announces Retirement : बांगलादेश क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे, कारण बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार तमीम इक्बालने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तमिम हा बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा आणि सर्वाधिक शतके करणारा खेळाडू आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत 15,000 हून अधिक धावा आणि 25 शतके ठोकली आहे. 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जवळ येत आहे, तेव्हा त्याचा अचानक निवृत्तीचा निर्णय खरोखरच धक्कादायक आहे. त्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती दिली की त्याच्या आयुष्यातील क्रिकेटचा अध्याय संपला आहे. तमिमने बांगलादेश क्रिकेट संघाच्या निवडकर्त्यांनाही त्याच्या निर्णयाची माहिती दिली आहे. याआधी जुलै 2023 मध्ये, तमिमने अचानक निवृत्तीची घोषणा केली होती, परंतु 24 तासांनंतर त्याने आपला निर्णय मागे घेतला होता.
🚨 TAMIM IQBAL ANNOUNCED HIS RETIREMENT FROM INTERNATIONAL CRICKET...!!! 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 10, 2025
- Thank you, Tamim! 🙇♂️ pic.twitter.com/5gJLJKKvzD
तमिम इक्बालने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने लिहिले आहे की, मी बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. माझा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रवास आता पूर्ण झाला आहे. मी बऱ्याच दिवसांपासून या निर्णयाचा विचार करत होतो आणि आता जेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफी येत आहे, पण मला पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात येऊन संघाचे लक्ष विचलित करायचे नव्हते. कर्णधार नझमुल हुसेन शांतोने मला संघात परत येण्यास मनापासून सांगितले. या विषयावर निवड समितीशीही चर्चा झाली. संघासाठी माझा विचार केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पण, मी माझ्या मनाचे ऐकले.
TAMIM IQBAL RETIRED FROM INTERNATIONAL CRICKET...!!!!
— Johns. (@CricCrazyJohns) January 10, 2025
- End of an Era in Bangladesh Cricket. pic.twitter.com/XnWpc6u9V7
तमीम इक्बालची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
जर आपण तमीम इक्बालच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकिर्दीबद्दल बोललो तर, त्याची गणना बांगलादेश क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाजांमध्ये केली जाते. तमिमने 70 कसोटी सामन्यांमध्ये 38.89 च्या सरासरीने 5134 धावा केल्या आहेत. ज्यात 10 शतके आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये, तमिमने 243 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 36.65 च्या सरासरीने 14 शतके आणि 56 अर्धशतकांसह एकूण 8357 धावा केल्या आहेत. तमिमने 78 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि 24.08 च्या सरासरीने 1758 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एक शतक आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे.
हे ही वाचा -