Bangladesh Cricket : बांगलादेश क्रिकेटमध्ये भूकंप; नवे सरकार येताच संचालकाचा राजीनामा, ICC बोर्डावर घालू शकते बंदी
BCB Director Jalal yunus Resigns : बांगलादेशातील सत्तापालटानंतर क्रिकेट बोर्डातही बदल सुरू झाले आहेत. बीसीबीचे संचालक आणि क्रिकेट ऑपरेशन्सचे अध्यक्ष जलाल युनूस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
Bangladesh Cricket Board : बांगलादेशातील सत्तापालटानंतर क्रिकेट बोर्डातही बदल सुरू झाले आहेत. बीसीबीचे संचालक आणि क्रिकेट ऑपरेशन्सचे अध्यक्ष जलाल युनूस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी बीसीबीचे अध्यक्ष नजमुल हसन यांनीही आपल्या पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती.
जलाल युनूस यांनी दिले निवेदन
आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची पुष्टी करताना जलाल युनूस यांनी क्रिकबझला सांगितले की, “मी क्रिकेटच्या हितासाठी बोर्डाचा राजीनामा दिला आहे.” भविष्यात मंडळात बदल अपेक्षित आहेत. बीसीबीचे अध्यक्ष नजमुल हसन यांनीही क्रिकेटच्या हितासाठी आपल्या पदाचा राजीनामा देऊन सरकारला सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.
🚨 OFFICIAL: Operations chairman Jalal Yunus has resigned from Bangladesh Cricket Board (BCB).#BCB #CricketTwitter pic.twitter.com/FfAv4SeBlv
— ER Saif 🇧🇩 (@ERSaif14) August 19, 2024
बोर्ड पॅनलच्या राजीनाम्याची मागणी
गेल्या काही दिवसांपासून शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर क्रिकेट बोर्डाचे अनेक माजी अधिकारी आणि आयोजक नझमुलच्या नेतृत्वाखालील बोर्ड पॅनेलच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. अलीकडेच अंतरिम सरकारचे क्रीडा सल्लागार आसिफ महमूद यांनी बीसीबीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.
आयसीसी फ्रेमवर्क अंतर्गत बोर्ड अंतरिम प्रमुखाची नियुक्ती करू शकते की नाही यावर चर्चा केली. सध्याच्या बोर्डाचा कार्यकाळ ऑक्टोबर 2025 मध्ये संपत आहे, परंतु BCB संचालक चिंतित आहेत की त्यांच्या पदावरून पायउतार झाल्यामुळे या वर्षी ऑक्टोबरमध्ये बांगलादेशमध्ये खेळल्या जाणाऱ्या महिला टी-20 वर्ल्ड कपवर परिणाम होऊ शकतो. बोर्डात सरकारी हस्तक्षेप वाढला तर आयसीसी बीसीबीच्या सदस्यत्वावर बंदी घालू शकते.
बांगलादेशचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर
बांगलादेशचा पुरुष क्रिकेट संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. येथे त्याला वनडे आणि कसोटी मालिका खेळायची आहे. 21 ऑगस्टपासून कसोटी मालिका सुरू होणार आहे. पहिला सामना 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान रावळपिंडी येथे होणार आहे. तर दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना रावळपिंडीत 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान होणार आहे.