(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बांगलादेशने घेतला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वाईट रिव्ह्यू; स्क्रीनवर पाहून स्वत:ही हसून लोटपोट
Bangladesh vs Sri lanka: बांगलादेश श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे.
Bangladesh vs Srilanka: बांगलादेश श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना श्रीलंकेने 328 धावांनी जिंकला. त्यानंतर आता दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली असून पहिला दिवसाचा खेळ संपला. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेने 4 गडी बाद 314 धावा केल्या आहेत. मात्र आज या सामन्यादरम्यान बांगलादेशने घेतलेल्या डीआरएस (रिव्ह्यू)ची मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे.
बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू अनेकदा त्यांच्या कृत्यांमुळे चर्चेत असतात. याचदरम्यान बांगलादेशचा कर्णधार नजमुल हसननेही श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मोठी चूक केली. या चूकीमुळे यानंतर सोशल मीडियावर बांगलादेशच्या खेळाडूंची खिल्ली उडवली जात आहे. श्रीलंकेच्या डावादरम्यान बांगलादेशचा कर्णधार नझमुल हसनने विचित्र रिव्ह्यू मागितला.
दरम्यान, कुसल मेंडिस फलंदाजी करत असताना बांगलादेशचा फिरकीपटू तैजुल इस्लाम गोलंदाजी करत होता. यावेळी तैजुल इस्लामने टाकलेला चेंडू मेंडिसने डिफेंड केला. चेंडू बॅटला लागला असतानाही बांगलादेशच्या कर्णधाराने कोणत्याही क्षणाचा विलंब न करता रिव्ह्यू घेतला. यावेळी गोलंदाजानेही काही सांगितले नाही. त्यानेही रिव्ह्यू घेण्यास सहमती दाखवली. बांगलादेशच्या कर्णधाराने घेतलेला रिव्ह्यू पाहून पंचांनाही आश्चर्य वाटले.
Bangladesh review system pic.twitter.com/Bjagg2ZLLR
— 𝑸𝒂𝒔𝒊𝒎 𝑯𝒖𝒔𝒂𝒊𝒏 🫧 (@qasim_says_) March 30, 2024
रिव्ह्यू पाहताना स्पष्ट दिसलं की बॉल बॅटच्या बरोबर मध्यभागी लागला होता. त्यामुळे पंचांनीही क्षणाचाही विलंब न करता नॉट आऊट दिलं. मैदानावरील मोठ्या स्क्रीनवर पाहिल्यानंतर चाहत्यांसह बांगलादेशच्या खेळाडूंनाही हसू आवरले नाही. आता सोशल मीडियावर बांगलादेशने घेतलेला हा रिव्ह्यू क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वाईट रिव्ह्यू म्हणून केले जात आहे.
पाहा संपूर्ण व्हिडिओ:
What just happened? 👀
— FanCode (@FanCode) March 30, 2024
.
.#BANvSL #FanCode #CricketTwitter pic.twitter.com/sJBR5jMSov
श्रीलंकेच्या 90 षटकांत 4 गडी गमावून 314 धावा
बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत श्रीलंकेने 1-० अशी आघाडी घेतली आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकण्यात श्रीलंकेचा संघ यशस्वी ठरला. दुसऱ्या सामन्यातही पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेचा संघ चांगल्या स्थितीत आहे. श्रीलंकेने 90 षटकांत 4 गडी गमावून 314 धावा केल्या आहेत.
संबंधित बातम्या:
...तेव्हा मिचेल स्टार्क आयपीएलमधील धोकादायक गोलंदाज ठरेल; इरफान पठाणने सांगितलं समीकरण!
आंद्रे रसेलची पत्नी आहे सुपरमॉडेल; सोशल मीडियावर नेहमी असते चर्चेत, पाहा Photos