एक्स्प्लोर

BAN vs SL Match Report : बांगलादेशचा नागीन डान्स, विश्वचषकात पहिल्यांदाच श्रीलंकेला हरवले

BAN vs SL Match Report : बांगलादेशनं श्रीलंकेवर तीन विकेट्सनी मात करून, वन डे विश्वचषकात आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली. दोन संघांमधला सामना ही निव्वळ औपचारिकता होती.

BAN vs SL Match Report : बांगलादेशनं श्रीलंकेवर तीन विकेट्सनी मात करून, वन डे विश्वचषकात आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली. बांगलादेश आणि श्रीलंका या दोन्ही संघांचं विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळं त्या दोन संघांमधला सामना ही निव्वळ औपचारिकता होती. या सामन्यात श्रीलंकेनं बांगलादेशला विजयासाठी २८० धावांचं आव्हान दिलं होतं. नजमल हुसेन शान्तो आणि शाकिब अल हसननं तिसऱ्या विकेटसाठी रचलेल्या १६९ धावांच्या भागिदारीच्या जोरावर बांगलादेशनं त्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. शान्तोनं ९० धावांची, तर शाकिबनं ८२ धावांची खेळी उभारली. त्याआधी, चरिथ असालंकानं झळकावलेल्या शतकानं श्रीलंकेला सर्व बाद २७९ धावांची मजल मारून दिली होती.  विश्वचषकाच्या इतिहासात बांगलादेशने पहिल्यांदाच श्रीलंकेचा पराभव केला. 

श्रीलंकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात खराब झाली. बांगलादेशला पहिला धक्का बसला तो १७ धावांवर. सलामीवीर तनजीद हसन 5 चेंडूत 9 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तनजीद हसनला दिलशान मधुशंकाने बाद केले. बांगलादेशला दुसरा धक्का 41 धावांवर बसला. लिटन दास 22 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. दिलशान मधुशंकानेही लिटन दासला आपला शिकार बनवले. बांगलादेशच्या दोन विकेट झटपट गेल्या. पण त्यानंतर अनुभवी शाकीब अल हसन आणि शान्तो यांनी डावाला आकार दिला. यानंतर बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन आणि नजमुल हुसेन शांतो यांच्यात १६९ धावांची मोठी भागीदारी झाली. बांगलादेशकडून नजमुल हुसेन शान्तोने सर्वाधिक धावा केल्या. नजमुल हुसेन शान्तोने 101 चेंडूत 90 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 12 चौकार मारले. त्याशिवाय कर्णधार शाकीब अल हसनने 65 चेंडूत 82 धावा केल्या. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 2 षटकार मारले.  
 
श्रीलंकेसाठी दिलशान मधुशंका सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 10 षटकांत 69 धावांत 3 फलंदाजांना तंबूत पाठवले. याशिवाय अँजेलो मॅथ्यूज आणि महिश तिक्षणा यांना प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.  रजिथा व्यतिरिक्त दुष्मंथा चमीरा आणि धनंजय डी सिल्वा यांना यश मिळाले नाही.

बांगलादेशच्या विजयानंतर गुणतालिकेत किती बदल झाला?

श्रीलंकेचा पराभव करत बांगलादेशचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. तर पराभवानंतर श्रीलंकेचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर घसरला आहे. बांगलादेशचे 8 सामन्यांत 4 गुण आहेत.  श्रीलंकेचेही 8 सामन्यांत 4 गुण झाले आहेत, मात्र चांगल्या नेट रनरेटमुळे बांगलादेश सातव्या स्थानावर आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Embed widget