(Source: Poll of Polls)
ENG vs IND 3rd ODI: टीम इंडियाची चिंता वाढली! जसप्रीत बुमराह निर्णायक सामन्यातून बाहेर, कारण काय?
Jasprit Bumrah Ruled Out: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला जातोय.
Jasprit Bumrah Ruled Out India vs England 3rd ODI: भारत आणि इंग्लंड (ENG vs IND) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) मैदानावर खेळला जातोय. या मालिकेतील पहिला सामना भारतानं जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यात इंग्लंनं विजय मिळवला आहे. ज्यामुळं तिसरा एकदिवसीय सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. याच पार्श्वभूमीवर भारताची चिंता वाढवणारी माहिती समोर येत आहे. "दुखापतीमुळं जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर झालाय. त्याच्याऐवजी युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला (Mohammed Siraj) संघात स्थान देण्यात आलंय", अशी माहिती भारताचा कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) दिली.
बीसीसीआयनं निवेदनात काय म्हटलंय?
“जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखण्यामुळे इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर पडलाय. अर्शदीप सिंहला निवडीसाठी विचारात घेतले गेले नाही कारण तो अद्याप तंदुरूस्त नाही." बीसीसीआयनं नाणेफेक दरम्यान सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर अपलोड केलेल्या निवेदनात म्हटलंय.
एकदिवसीय मालिकेत जसप्रीत बुमराहचं दमदार प्रदर्शन
इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत जसप्रीत बुमराहनं जबरदस्त कामगिरी करून दाखवली. या मालिकेत त्यानं 8.92 च्या सरासरीनं आणि 3.92 च्या इकोनॉमी रेटनं सर्वाधिक 8 विकेट्स घेतल्या. या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्यानं त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली. 7.2-3-19-6 अशी त्यानं कामगिरी करून दाखवली.
मोहम्मद सिराजचा इंग्लंडच्या मायभूमीवर पहिलाच एकदिवसीय सामना
वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनं या वर्षाच्या सुरुवातीला घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध चार एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना खेळला होता. जसप्रीत बुमराहच्या जागी खेळणारा मोहम्मद सिराज इंग्लंडमध्ये आणि इंग्लंडविरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील पहिला एकदिवसीय सामना खेळत आहे.
भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज.
इंग्लंडचा संघ:
जोस बटलर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय, जो रूट, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, डेव्हिड विली, ब्रायडन कार्स, रीस टॉपली, क्रेग ओव्हरटन.
हे देखील वाचा-
- Kohli Practice Video: विराटची आज अग्निपरीक्षा! नेटमध्ये करतोय जोरदार सराव; पाहा व्हिडिओ
- ENG Vs IND 3rd ODI: आज ठरणार! एकदिवसीय मालिका कोण जिंकणार? पाहा भारत- इंग्लंड यांच्यातील हेड टू हेड रेकार्ड
- PV Sindhu: पीव्ही सिंधूची जबरदस्त कामगिरी! सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात चीनच्या वांग झि यिवर पडली भारी