(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PAK vs IRE Babar Azam: बाबर आझमने विराट कोहली अन् रोहित शर्माला टाकले मागे; आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात केला भीमपराक्रम
PAK vs IRE Babar Azam: डब्लिनमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने आयर्लंडचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह पाकिस्तानने मालिका 2-1 ने जिंकली.
PAK vs IRE Babar Azam: पाकिस्तानने (Pakistan) आयर्लंड विरुद्ध खेळलेली तिसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवला आहे. डब्लिनमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने आयर्लंडचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह पाकिस्तानने मालिका 2-1 ने जिंकली.
तिसऱ्या टी-20 सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) पाकिस्तानसाठी 42 चेंडूत 75 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली, ज्यात 6 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. या खेळीने बाबरने भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहलीचा (Virat Kohli) आणि रोहित शर्माचा (Rohit Sharma) मोठा विक्रम मोडला.
Pakistan win the #IREvPAK T20I series 🇵🇰🏆#BackTheBoysInGreen pic.twitter.com/Y2DhX4WRkj
— Pakistan Cricket (@TheRealPCB) May 14, 2024
खरं तर, आता बाबर आझम आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक 50 पेक्षा जास्त धावा खेळाडू बनला आहे. यापूर्वी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 38 वेळा 50 धावांचा टप्पा ओलांडला आहे. परंतु बाबर आझमने 39 वेळा 50 पेक्षा जास्त धावा करण्याचा टप्पा ओलांडला आहे, ज्यासह तो फॉरमॅटमध्ये सर्वाधिक 50+ धावा करणारा फलंदाज बनला आहे.
The captain is putting on a show 🔥
— Pakistan Cricket (@TheRealPCB) May 14, 2024
Babar Azam scores his 36th T20I fifty ✨#IREvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/fZqrTLDadk
आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 50+ ची सर्वोच्च धावसंख्या
बाबर आझम- 39
विराट कोहली- 38
रोहित शर्मा- 34
मोहम्मद रिझवान- 29
डेव्हिड वॉर्नर - 27
पाकिस्तानने तिसरा सामना जिंकून मालिका जिंकली-
डब्लिनमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या आयर्लंडने 20 षटकांत 7 गडी गमावून 178 धावा केल्या. कर्णधार आणि यष्टिरक्षक फलंदाज लॉर्कन टकरने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली, त्याने 41 चेंडूत 13 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 73 धावा केल्या. त्यानंतर पाकिस्तानने लक्ष्याचा पाठलाग करताना 17 षटकांत 4 गडी राखून विजय मिळवला. संघासाठी कर्णधार बाबर आझमने 42 चेंडूंत 6 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 75 धावा केल्या. याशिवाय मोहम्मद रिझवानने 38 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 56 धावा केल्या. बाबर आणि रिझवान यांनी दुसऱ्या विकेटसाठी 139 (74) धावांची भागीदारी केली.