World Cup 2023: पाच वेळच्या विश्वविजेत्याची गचाळ फिल्डिंग, आफ्रिकन फलंदाजांचे 6 झेल सोडले
SA vs AUS Catch Drop : पाच वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाने दक्षिण आफ्रिकाविरोधात गचाळ फिल्डिंग केली. आतापर्यंतच्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने अव्वल दर्जाची फिल्डिंग केली आहे.
SA vs AUS Catch Drop : पाच वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाने दक्षिण आफ्रिकाविरोधात गचाळ फिल्डिंग केली. आतापर्यंतच्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने अव्वल दर्जाची फिल्डिंग केली आहे. पण यंदाच्या विश्वचषकाची सुरुवातच त्यांनी गचाळ फिल्डिंग केली आहे. भारताविरोधात विराट कोहलीचा झेल सोडला होता. त्यानंतर कोहलीने सामना फिरवला. आता दुसऱ्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी खराब फिल्डिंग केली. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचे एक दोन नव्हे सहा झेल सोडले. याचाच फायदा घेत दक्षिण आफ्रिकेने 50 षटकात सात विकेटच्या मोबदल्यात 311 धावांचा डोंगर उभारला.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण क्विंटन डि कॉक याने वादळी फलंदाजी केली. दक्षिण आफ्रिकेने 311 धावांचा डोंगर उभारला. पण त्याला ऑस्ट्रेलियानेही तितकीच साथ दिली. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचे सहा झेल सोडले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ सोशल मीडियावर ट्रोल झाला. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू हाताला काय लावून आलेत, असा प्रश्न चाहत्यांकडून विचारला जातोय. ऑस्ट्रेलियन खेळाडू हातावर बटर घेऊन फिल्डिंगसाठी आले होते. त्यामुळे कांगारूंनी अनेक झेल सोडले. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स ऑस्ट्रेलियन संघाच्या क्षेत्ररक्षणावर सातत्याने कमेंट करत आहेत.
Nothing going right for Australia in World Cup 2023 with drop catches, miss-field, poor form by many players. pic.twitter.com/bhcaFOuhtf
— Johns. (@CricCrazyJohns) October 12, 2023
Australia and drop catches. Another one goes down.
— Bharath Ramaraj (@Fancricket12) October 12, 2023
6 Drop Catches By Australia Today! 🫨#Cricket #Australia #WorldCup #CWC pic.twitter.com/s4KViVOHkG
— CRICKETNMORE (@cricketnmore) October 12, 2023
Australia and drop catches, how on earth ,like how! #AUSvsSA #ICCCricketWorldCup
— paRaY_YasiR ✍️ (@ParayYasir2) October 12, 2023
Hmmm. World Cup. Champions #Australia drop 7 catches in one match. Aisa Bhi Hota Hai.
— Dr. A. Velumani.PhD. (@velumania) October 12, 2023
Two drop catches off Pat Cummins' over. Poor fielding from Australia. pic.twitter.com/bWQb2CRTMd
— CricTracker (@Cricketracker) October 12, 2023
Cricket fans in Lucknow counting the bad review & drop catches of Australia. pic.twitter.com/EnWd2GatK0
— Johns. (@CricCrazyJohns) October 12, 2023
ऑस्ट्रेलियासमोर 312 धावांचे आव्हान -
प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 50 षटकात 7 विकेटच्या मोबदल्यात 311 धावांचा डोंगर उभरला. ऑस्ट्रेलियाला पहिल्या विजयासाठी 312 धावांचे आव्हान आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी सलामीवीर क्विंटन डी कॉकने 106 चेंडूत 109 धावांची खेळी केली. एडन मार्करामने 44 चेंडूत 56 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. त्याशिवाय जोश हेझलवूड, पॅट कमिन्स आणि अॅडम झम्पाला प्रत्येकी 1 - 1 लिकेट मिळाली.