Australia VS Scotland : ऑस्ट्रेलियाची उडाली खिल्ली! ट्रॉफीच्या नावाखाली दिली 'वाटी', VIDEO व्हायरल
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाने स्कॉटलंडचा दौरा केला आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका 3-0 ने जिंकली.
Australia vs Scotland Series Trophy : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाने स्कॉटलंडचा दौरा केला आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका 3-0 ने जिंकली. मिचेल मार्शच्या नेतृत्वाखाली कांगारूंनी शानदार खेळ करत तिसरा टी-20 सामना 6 गडी राखून जिंकला. मालिका जिंकल्यानंतर जेव्हा त्यांची ट्रॉफी उचलण्याची पाळी आली, तेव्हा त्यांना स्कॉटलंड क्रिकेट बोर्डाकडून मिळालेली ट्रॉफी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
स्कॉटलंडला 3-0 ने पराभूत केल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ चमकदार ट्रॉफी मिळण्याची आशा होती. ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्श ट्रॉफी घेण्यासाठी आला, तेव्हा त्याला ट्रॉफी पाहूण धक्का बसला. हे काय आहे यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. त्याने ती ट्रॉफी घेतली आणि आत काही आहे का ते पाहिले. ट्रॉफीच्या नावावर त्यांना वाटीच्या आकारा सारखं काहीतरी दिल्या गेले. यानंतर तो खूप हसला आणि मग त्याने जाऊन आपल्या खेळाडूंसोबत फोटोशूट केले.
Yeh kaisa trophy 🏆 hai 😂😂
— Rohit sharma fc911 (@gulshansinghra) September 9, 2024
Australia vs Scotland series trophy 😂😂#ENGvsSL #INDvBAN #JISOOxTommyHilfigerSS25#LaCasaDeLosFamososMexico#BumrahWithAmericanPistachios pic.twitter.com/J1WgE8Agb0
ऑस्ट्रेलियन खेळाडू हसले
ऑस्ट्रेलियन खेळाडू ट्रॉफी घेऊन जल्लोष करणार याची वाट पाहत होते, पण जेव्हा त्यांची नजर ट्रॉफीवर पडली तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले. सर्वांनी ती ट्रॉफी हातात घेतली आणि ते काय आहे ते पाहिले, मग हसू लागले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहते त्यावर मजेशीर कमेंट करत आहेत.
Australia vs Scotland series AUS Win.
— Cricktainment (@Cricktainments) September 10, 2024
Trophy 🏆 katori wali trophy Aussi players bhi haste huye 😂 india main sab Ghar main mil jayegi ye trophy 🤩 #Australia #TestCricket @ABCricinfo16 @Ctrlmemes_ pic.twitter.com/0WblhUgWG1
ऑस्ट्रेलिया-इंग्लंड सामना
स्कॉटलंडविरुद्ध 3-0 अशा विजयानंतर ऑस्ट्रेलियन संघ आता कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लंडशी भिडणार आहे. दोन्ही संघांमध्ये 3 टी-20 सामने आणि 5 एकदिवसीय सामने खेळवले जातील. पहिला टी20 10 सप्टेंबर (आज) रोजी साउथहॅम्प्टन येथे खेळवला जाईल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक
पहला टी-20 सामना - 10 सप्टेंबर, साउथॅम्प्टन
दुसरा टी-20 सामना - 13 सप्टेंबर, कार्डिफ
तिसरा टी-20 सामना - 15 सप्टेंबर, मँचेस्टर
पहिली वनडे - 19 सप्टेंबर, नॉटिंगहॅम
दुसरी वनडे – 21 सप्टेंबर, लीड्स
तिसरी वनडे – 24 सप्टेंबर, चेस्टर ली स्ट्रीट
चौथी वनडे - 27 सप्टेंबर, लंडन
पाचवी वनडे - 29 सप्टेंबर, ब्रिस्टल
हे ही वाचा -