एक्स्प्लोर

IND vs NEP highlights : भारताचा नेपाळवर 23 धावांनी विजय, जयस्वाल-बिश्नोई चमकले

Asian Games 2023 India vs Nepal Live Score : आशियाई क्रीडा स्पर्धेत मंगळवारी भारतीय क्रिकेट संघाचा सामना नेपाळच्या संघासोबत आहे.

LIVE

Key Events
IND vs NEP highlights : भारताचा नेपाळवर 23 धावांनी विजय, जयस्वाल-बिश्नोई चमकले

Background

Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत मंगळवारी भारतीय क्रिकेट संघाचा सामना नेपाळच्या संघासोबत आहे. मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर टीम इंडियाची जबाबदारी असेल. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाला थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळाला होता. आता मंगळवारपासून टीम इंडिया आशियाई क्रीडा स्पर्धेत सुरुवात करत आहे. ऋतुराज गायकवाडच्या संघाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा सर्वच क्रीडा चाहत्यांना आहे. हरमनप्रीत कौरच्या संघाने महिला क्रिकेट स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलेय. आता ऋतुराज गायकवाडच्या संघाचा सुवर्णपदक पटकावण्याचा नंबर असेल. मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता भारत आणि नेपाळ यांच्यातील लढत होईल.

नेपाळ क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. नेपाळच्या फलंदाजाने अवघ्या नऊ चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याशिवाय सर्वात वेगवान शतकाचा विक्रमही केला. इतकेच काय तर टी20 मध्ये सर्वाधिक धावा चोपण्याचा पराक्रमही नेपाळ संघाने केला आहे. पण आता नेपाळसमोर तगड्या टीम इंडियाचे मजबूत आव्हान असेल.

भारताशिवाय पाकिस्तान संघानेही क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता. पाकिस्तानचा सामना हाँगकाँग संघासोबत असेल. तर श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये लढत होणार आहे. अखेरचा आणि चौथा क्वार्टर फायनल सामना बांगलादेश आणि मलेशिया संघामध्ये होणार आहे. पराभूत होणाऱ्या संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. भारतीय संघाने उप उपांत्य फेरीत नेपाळचा पराभव केल्यास उपांत्य फेरीत भारतापुढे बांगलादेश आणि मंगोलिया यांच्यातील विजेत्या संघाचे आव्हान असेल. 

कुठे होणार सामना -  

19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट स्पर्धेचे सामने चीनमधील हांगझोऊ येथे आयोजित केले आहेत. सर्व सामने झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंडवर खेळले जातील. ZJUT क्रिकेट स्टेडियम थरार पाहायला मिळणार आहे. 

भारत आणि नेपाळ यांच्यातील सामना कधी सुरु होणार?

एशियन गेम्स 2023 लाईव्ह प्रेक्षपण कुठे होणार ? 

आशियाई क्रीडा 2023 मधील सर्व कार्यक्रमांचे भारतामध्ये थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. यामध्ये, टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स चॅनल असेल, तर सोनी लाइव्ह अॅपवर सामन्यांचे ऑनलाइन स्ट्रीमिंग असेल. सोनी लाइव्ह अॅपवर अथवा संकेतस्थळावर मोफत सामना पाहता येईल.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत आणि नेपाळचे संघ - 

भारत- ऋतुराज गायकवाड (कर्णधार), मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), यशस्वी जयसवाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, अवेश खान , अर्शदीप सिंह.

राखीव खेळाडू : यश ठाकुर, साई किशोर, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, साई सुदर्शन.

Ruturaj Gaikwad (c), Mukesh Kumar, Shivam Mavi, Shivam Dube, Prabhsimran Singh (wk), Yashasvi Jaiswal, Rahul Tripathi, Tilak Varma, Rinku Singh, Jitesh Sharma (wk), Washington Sundar, Shahbaz Ahmed, Ravi Bishnoi, Avesh Khan, Arshdeep Singh.

नेपाळ- रोहित पौडेल (कर्णधार), करण केसी, प्रैटिस जीसी, आसिफ शेख (विकेटकीपर), कुशल मल्ला, गुलशन झा, सोमपाल कामी, सुदीप जोरा, बिनोद भंडारी, कुशल भुर्टेल, दीपेंद्र सिंह ऐरी, ललित राजबंशी, बिबेक कुमार यादव, अभिनाश बोहरा, संदीप लामिछाने.

09:54 AM (IST)  •  03 Oct 2023

नेपाळचा 23 धावांनी पराभव

नेपाळचा 23 धावांनी पराभव

09:50 AM (IST)  •  03 Oct 2023

नेपाळला 6 चेंडूत 30 धावांची गरज

नेपाळला 6 चेंडूत 30 धावांची गरज आहे. भारताला दोन विकेटची गरज

09:41 AM (IST)  •  03 Oct 2023

नेपाळला आठवा धक्का

नेपाळला आठवा धक्का बसलाय.. भारत विजयापासून दोन पावले दूर

09:39 AM (IST)  •  03 Oct 2023

नेपाळला सातवा धक्का

नेपाळला सातवा धक्का.. भारताची विजयाकडे वाटचाल

09:37 AM (IST)  •  03 Oct 2023

150 धावांत सहा फलंदाज तंबूत

नेपाळचे 150 धावांत सहा फलंदाज तंबूत परतले आहेत

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Bangar on Vidhan Sabha : 25 हजारांच्या फरकाने सीट निघेल, मतदानानंतर संतोष बांगर निवांतRajesaheb Deshmukh : धनंजय मुंडे यांच्या गुंडानी मतदानाच्या मशीन फोडल्य,देशमुखांचा हल्लाबोलSolapur Sharad Koli Crime : प्रणिती शिंदेंविरोधात आंदोलन करणाऱ्या कोळींविरोधात गुन्हा दाखलAvinash Jadhav Misal Pav : मतदानानंतर निवांत,अविनाश जाधवांनी लुटला मामलेदार मिसळीचा आस्वाद...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
Embed widget