एक्स्प्लोर

आशिया चषकाचे सर्व सामने दुपारी 3 वाजता, कधी अन् कुठे पाहाल मॅच?

Asia Cup Schedule & Timing: आशिया चषकाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 30 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे.

Asia Cup Schedule & Timing: आशिया चषकाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 30 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. काही दिवसांपूर्वीच आशिया चषकाचे वेळापत्रक जारी केले होते. यंदाचा आशिया चषक एकदिवसीय स्वरुपात खेळवला जाणार आहे. आशिया चषक म्हणजे विश्वचषकाची रंगीत तालीमच होय. आता सर्व सामन्यांच्या वेळाही समोर आल्या आहेत. स्पर्धेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजल्यापासून खेळवले जातील.

आशिया चषकात भारताचा पहिला सामना 2 सप्टेंबर 2023 रोजी पाकिस्तानविरोधात होणार आहे. हा सामना श्रीलंकामधील कँडी येथील मैदानात होणार आहे. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्या सामन्याने आशिया चषकाची सुरुवात होणार आहे. पहिला सामना पाकिस्तानमधील मुल्तान मैदानावर रंगणार आहे. भारतीय संघ वगळता इतर सर्व संघ पाकिस्तानमध्ये किमान एक सामना तरी खेळणार आहे. 30 ऑगस्ट 2023 ते 17 सप्टेंबर 2023 या दरम्यान आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्थान आणि नेपाळ या देशांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. 13 एकदिवसीय सामन्यानंतर आशियाचा किंग कोण ? यावरुन पडदा उठणार आहे. 

कधी कुठे पाहाल आशिया चषकाचे सामने?

आशिया चषकाचे सर्व सामने भारतीय वेळेनुसार, दुपारी तीन वाजता सुरु होणार आहेत. भारतीय चाहते आशिया चषकाचे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहता येतील. त्याशिवाय  हॉटस्टार अॅपवरुनही सामन्यांचा आनंद घेता येईल. डीडी स्पोर्ट्स चॅनलवरही लाईव्ह सामना पाहाता येणार आहे. आशिया चषकाच्या ब्रॉडकास्टिंगचे राइट्स स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत.  त्याशिवाय एबीपी माझ्याच्या संकेतस्थळावरही आशिया चषकासंदर्भातील अपडेट तुम्हाला पाहाता येतील. आशिया चषकासाठी हायब्रिड मॉडेल वापरण्यात आलेय. पाकिस्तानमध्ये चार सामने होणार आहेत. तर उर्वरित सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत. हायब्रिड मॉडेलचा स्विकार केल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये जाणार नाही? हे स्पष्ट झालेय. टीम इंडियाचे सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत. बुधवारी आशिया चषक वेळापत्रकाची घोषणा होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरारक सामना श्रीलंकामध्ये होणार आहे. 

विश्वचषकाआधी भारत आणि पाकिस्तानचा संघ आशिया चषकात आमनेसामने असतल. 14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होणार आहे.  विश्वचषकाआधी भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन वेळा सामना होण्याची शक्यता आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

ना गोलंदाजी, ना फलंदाजी, तरीही 'सामनावीर'चा पुरस्कार मिळाला, 'या' खेळाडूच्या नावावर अनोखा विक्रम
ना गोलंदाजी, ना फलंदाजी, तरीही 'सामनावीर'चा पुरस्कार मिळाला, 'या' खेळाडूच्या नावावर अनोखा विक्रम
Aaryavir Sehwag Century : पाकिस्तानविरुद्ध फ्लॉप, पण 'करो या मरो' सामन्यात सेहवागच्या लेकाने मैदान गाजवलं! आशिया कपमध्ये ठोकलं वादळी शतक
पाकिस्तानविरुद्ध फ्लॉप, पण 'करो या मरो' सामन्यात सेहवागच्या लेकाने मैदान गाजवलं! आशिया कपमध्ये ठोकलं वादळी शतक
IND vs NZ 4th ODI : तिसरा वनडे पावसामुळे रद्द! आता भारत-न्यूझीलंड चौथा वनडे सामना कधी आणि कुठे? जाणून घ्या तारीख, वेळ अन् स्टेडियम
तिसरा वनडे पावसामुळे रद्द! आता भारत-न्यूझीलंड चौथा वनडे सामना कधी आणि कुठे? जाणून घ्या तारीख, वेळ अन् स्टेडियम
IND vs NZ 3rd ODI : ज्याची भीती होती तेच अखेर घडले! एकही चेंडू न फेकता भारत-न्यूझीलंड सामना रद्द, क्रिकेटप्रेमींचा मोठा हिरमोड
ज्याची भीती होती तेच अखेर घडले! एकही चेंडू न फेकता भारत-न्यूझीलंड सामना रद्द, क्रिकेटप्रेमींचा मोठा हिरमोड

व्हिडीओ

Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या मागे; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज'कारण', राहुल गांधींनाही केलं लक्ष्य
गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या मागे; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज'कारण', राहुल गांधींनाही केलं लक्ष्य
Embed widget