एक्स्प्लोर

धोनीच्या शाळेत शिकलेले गोलंदाज भारताची डोकेदुखी वाढवणार?

Asia Cup 2023 : पाकिस्तानमधील मुल्तान येथे आशिया चषकाला दिमाखात सुरुवात झाली.

Asia Cup 2023 : पाकिस्तानमधील मुल्तान येथे आशिया चषकाला दिमाखात सुरुवात झाली. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात सलामीचा सामना झालाय. आशिया चषकाचे चार सामने पाकिस्तान आणि 9 सामने श्रीलंकामध्ये होणार आहेत. श्रीलंका संघाला मायदेशात होणाऱ्या सामन्याचा फायदा होणारआहे. श्रीलंकेचा पहिला सामना बांगलादेशविरोधात 31 ऑगस्ट रोजी पल्लेकल येथे होणार आहे. श्रीलंका संघाने आशिया चषकासाठी निवडलेल्या संघामध्ये दोन भेदक गोलंदाजांना निवडलेय. हे दोन्ही गोलंदाज आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाचा भाग आहेत. महिश तिक्षणा आणि मथिशा पाथिराणा आयपीएलमध्ये चन्नईच्या संघाचा भाग आहेत. धोनीने तयार केलेल्या या दोन गोलंदाज श्रीलंकेसाठी महत्वाची भूमिका बजावतील. धोनीच्या शाळेत तयार झालेले हे गोलंदाज भारतीय फलंदाजांची डोकेदुखी वाढवू शकतील, असा अंदाज वर्तवला जातोय.

महिश तिक्षणा आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाचा भाग आहे.  पदार्पणाच्या मोसमात त्याने 9 सामन्यात 12 विकेट घेतल्या. कर्णधार धोनीने तीक्षाणावर खूप विश्वास व्यक्त केला होता आणि स्पर्धेदरम्यान खूप मदतही केली होती. तिक्षणाने आयपीएल 2023 मध्येही धोकादायक गोलंदाजी केली होती.  आता तो आशिया कपमध्ये श्रीलंकेकडून खेळणार आहे. धोनीने मथिशा पाथिराणावरही विश्वास दाखवला होता.  त्याला सतत संधी दिली आणि त्याच्याधील टॅलेंट विकसित करण्यात खूप मदत केली. 2022 मध्ये पाथीराणा याला केवळ दोन आयपीएल सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने दोन विकेट्स घेतल्या. पण पुढच्या मोसमात 12 सामने खेळले. आयपीएल 2023 च्या 12 सामन्यात पाथीरानाने 19 विकेट घेतल्या. तो धोनीच्या महत्त्वाच्या गोलंदाजांपैकी एक ठरला. आता तो आशिया कपमध्ये श्रीलंकेकडून खेळण्यासाठीही सज्ज झाला आहे.

आशिया चषक स्पर्धेत श्रीलंकेसाठी पाथीराणा आणि तीक्षाणा महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. हे दोघेही भारताविरुद्ध प्रभावी कामगिरी करु शकतात. साखळी फेरीनंतर सुपर 4 च्या सामन्यावेळी भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे. भारत आणि श्रीलंका वेगवेगळ्या गटामध्ये आहेत. त्यामुळे सुपर 4 सामन्यात श्रीलंका आणि भारत यांच्यामध्ये लढत होणार आहे. भारताविरोधात हे दोन्ही खेळाडू प्लेईंग 11 चा भाग असतील. त्या सामन्यात हे गोलंदाज भारतीय फलंदाजांची डोकेदुखी वाढवू शकतात. 

हायब्रिड मॉडेलनुसार आशिया चषक - 

यंदाच्या आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. पण भारताने पाकिस्तानात जाऊन सामने खेळण्यास नकार दिला. त्यानंतर ही स्पर्धा हायब्रिड पद्धतीने खेळवली जाईल, असे निश्चित झाले. याअंतर्गत मुल्तान आणि लाहोर येथे आशिया चषकाचे 4 सामने खेळले जातील, तर श्रीलंकेत 9 सामने होतील.

सहा संघ, स्पर्धा कशी रंगणार ?

आशिया चषकात एकूण सहा संघ भाग घेत आहेत, त्यांना दोन गटात विभागले आहे. अ गटात भारत, नेपाळ आणि पाकिस्तान संघांना ठेवण्यात आलेय.  तसेच, ब गटात अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. यानंतर सुपर 4 फेरीत दोन्ही गटातील अव्वल 2 संघ एन्ट्री करतील. सुपर 4 फेरीत प्रत्येक संघ एकमेकांशी एक वेळा भिडतील. त्यामधील आघाडीचे दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील.  

महत्त्वाच्या बातम्या

Basit Ali Heart Attack : छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
IND vs SL 1st Test DAY-3 : सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
Afghanistan squad for Asian Games : रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले
रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले
Aus vs Ban 1st Test : आधी बांगलादेशने लाज काढली, आता ICC करणार ऑस्ट्रेलियाचा हिशेब; 42 लाखांचा दंड अन् WTC पॉइंट्सही जाणार, नेमकं काय घडलं?
आधी बांगलादेशने लाज काढली, आता ICC करणार ऑस्ट्रेलियाचा हिशेब; 42 लाखांचा दंड अन् WTC पॉइंट्सही जाणार, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget